मद्यपी रिक्षाचालकाने पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना पुणे शहरातील पाषाण परिसरात घडली. पोलीस गाडीतून रिक्षाचालकाला नेण्यात येत असताना त्याने गाडीचा दरवाजा जोरात आपटल्याने उपनिरीक्षकाच्या बोटाला दुखापत झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी रिक्षाचालक अनिल प्रकाश सदाशिव (वय ३६, सध्या रा. निम्हण आळी, पाषाण, मूळ रा. अकोला) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून पोलीस कर्मचारी दत्तात्रय गेंगजे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाषाण परिसरात मध्यरात्री पोलिसांकडून गस्त घालण्यात येत होती. त्या वेळी रिक्षाचालक अनिल वेडीवाकडी रिक्षा चालवित होता. त्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका मोटारीच्या डिक्कीवर दगड मारला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alcoholic rickshaw driver pushes police in pune pune print news msr
First published on: 25-06-2022 at 10:47 IST