आयुक्तांची स्पष्टोक्ती

पिंपरीतील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान या संस्थेकडील थकीत रक्कम माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट करत ‘डीवाय’ सह सर्वच थकबाकीदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल, असे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

दंतकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि महिला वैद्यकीय महाविद्यालयाची १४ कोटी ६३ लाख रूपयांच्या थकबाकीचा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. तेथे जो निर्णय होईल, त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. थकबाकीची रक्कम भरण्याविषयी केवळ ‘डीवाय’ संस्थेलाच नव्हे, तर सर्वच थकबाकीदारांना अंतिम तारीख देण्यात आली आहे. थकबाकीदारांवर यापूर्वी कठोर कारवाई करण्याचे धोरण पालिकेने ठेवले आहे.

संबंधित थकबाकीदारांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास याबाबतचा लवकरच निर्णय घेऊ, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

‘डीवाय’ची साडेचार कोटींची थकबाकी जमा

‘डीवाय’ने विविध मिळकतींची साडेचार कोटींची थकबाकी पिंपरी महापालिकेकडे जमा केली. मात्र, आणखी १४ कोटींच्या थकबाकींचे प्रकरण न्यायालयात आहे. ती रक्कम वसूल करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘लोकसत्ता’ने सोमवारी प्रसिद्ध केले. यासंदर्भात, पत्रकारांनी विचारणा केली असता, आयुक्त वाघमारे यांनी पालिकेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘डीवाय’कडे असलेल्या विविध थकबाकी ते भरत आहेत. कोणत्याही थकबाकीला माफी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.