scorecardresearch

Premium

पुणे : ‘लेझर बीम’च्या विरोधात आता सर्वपक्षीय लढा, जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय

गणेशोत्सवातील धडकी भरविणारा डीजेचा आवाज आणि आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या लेझर बीमच्या विरोधात आता सर्वपक्षीय राजकीय लढा सुरू झाला आहे.

fight against laser beam
पुणे : ‘लेझर बीम’च्या विरोधात आता सर्वपक्षीय लढा, जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय (image – pixabay/representational image)

पुणे : गणेशोत्सवातील धडकी भरविणारा डीजेचा आवाज आणि आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या लेझर बीमच्या विरोधात आता सर्वपक्षीय राजकीय लढा सुरू झाला आहे. महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांनी डीजे आणि लेझरच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या मंगळवारपर्यंत याचिका दाखल करण्यात येणार आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा सलग दुसऱ्या वर्षी ध्वनिपातळीने शंभरी पार केली. पोलिसांनी निर्बंध घालूनही मिरवणुकीत त्याचे पालन झाले नाही. वाढलेल्या ध्वनिपातळीचा त्रास झाल्याबाबत पुणेकरांकडून समाजमाध्यमांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात असतानाच आता राजकीय पक्षांनी भूमिका घेत निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्कृतीचे पालन करताना सामाजिक भान हवेच, अशी भूमिका घेत माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी सभागृहनेते उज्ज्वल केसकर, सतीश देसाई ॲड. श्रीकांत शिरोळे यांच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल करणार आहेत. मंगळवारपर्यंत ही याचिका दाखल होईल, अशी माहिती अंकुश काकडे यांनी दिली.

farmers protest
शेतकऱ्यांवर NSA अंतर्गत कारवाई करण्याच्या निर्णयावर खट्टर सरकारकडून यू-टर्न; नेमके कारण काय?
Manoj Jarange Patil assured the High Court that the agitation will be carried out in peaceful way
आंदोलन सर्वतोपरी शांततापूर्ण मार्गाने करणार, मनोज जरांगेंची उच्च न्यायालयात हमी
MOFA Act
‘मोफा’ कायद्याचे अस्तित्व नाकारण्याचा न्याय व विधि विभागाचा प्रयत्न फोल!
Congress will protest against Devendra Fadnavis Energy Ministry
फडणवीसांच्या ऊर्जा खात्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार, ‘ही’ आहे कारणे

हेही वाचा – “सर्वात जास्त पैसेवाले लोकही या देशात ४० टक्के कर भरत नाहीत, मात्र…”, सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

हेही वाचा – पुणे : ससूनमधील सत्य अखेर बाहेर येणार? त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाकडे लक्ष

गणेशोत्सवातील आणि प्रामुख्याने विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा धडकी भरविणारा दणदणाट, ढोल-ताशा पथकांच्या वाढत्या संख्येमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि मिरवणुकीत लेझरच्या वापरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात डीजे आणि लेझर बीमच्या विरोधात याचिका दाखल करण्यात येणार असून, त्यानंतर ढोल-ताशा पथकांसंदर्भात याचिका दाखल करण्यात येईल, असे काकडे यांनी स्पष्ट केले. डीजे आणि लेझरच्या वापराबाबत निर्बंध हवेत, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: All parties fight now against the laser beam decision to file pil pune print news apk 13 ssb

First published on: 07-10-2023 at 10:59 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×