पुणे विभागात रेल्वेचे सव्वा लाख फुकटे प्रवासी!

रेल्वेच्या पुणे विभागामध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे.

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ७ कोटी १७ लाखांची दंडवसुली

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये फुकटे प्रवासी पकडले जाण्याची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. पुणे विभागाने केलेल्या नऊ महिन्यांच्या कारवाईमध्ये यंदा तब्बल १ लाख २८ हजार फुकटे प्रवासी सापडले आहेत. विनातिकीट प्रवास करणाऱ्या या प्रवाशांकडून ७ कोटी १७ लाख रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे.

रेल्वेच्या पुणे विभागामध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. विभागातील सर्वात मोठे स्थानक असलेल्या पुणे स्थानकात दिवसाला तीनशेच्या आसपास गाडय़ा ये-जा करीत असतात. त्यात विभागातून बाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांची संख्याही मोठी आहे. त्याचप्रमाणे पुणे-लोणावळा, पुणे- दौंड, पुणे-बारामती आदी मार्गावर उपनगरीय सेवेत धावणाऱ्या गाडय़ांचाही त्यात समावेश आहे. गाडय़ा आणि प्रवाशांची संख्या वाढत असताना तिकीट तपासनिसांची संख्या मर्यादित आहे. मात्र, रेल्वेकडून फुकटय़ा प्रवाशांना पकडण्यासाठी सातत्याने विशेष अभियान राबविण्यात येते. त्यात  रोजच मोठय़ा प्रमाणावर विनातिकीट प्रवासी आढळून येत आहेत.

पुणे विभागाकडून पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे मिरज आणि मिरज कोल्हापूर या टप्प्यांमध्ये तिकीट तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे. २०१९ मधील एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीतील कारवाईची आकडेवारी रेल्वेने जाहीर केली आहे. या कालावघीत २ लाख ७६ हजार ८०० प्रकरणांमध्ये रेल्वेने १४ कोटी ३९ लाखांहून अधिक दंडाची वसुली केली आहे. त्यात विनातिकीट प्रवास करताना पकडल्या गेलेल्यांची संख्या १ लाख २८ हजार इतकी आहे. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. व्ही. एन. सुभाष यांच्या नेतृत्वाखाली तिकीट तपासनीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली. अशा प्रकारची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याने प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा, दंडाची वसुली केली जाईल. दंड न भरल्यास संबंधिताला कारागृहात पाठविले जाईल, असा इशारा रेल्वेकडून देण्यात आला आहे.

रोजच मोठय़ा प्रमाणावर विनातिकीट प्रवासी आढळून येत आहेत. पुणे विभागाकडून पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे मिरज आणि मिरज कोल्हापूर या टप्प्यांमध्ये तिकीट तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे. २०१९ मधील एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीतील कारवाईची आकडेवारी रेल्वेने जाहीर केली आहे. या कालावघीत २ लाख ७६ हजार ८०० प्रकरणांमध्ये रेल्वेने १४ कोटी ३९ लाखांहून अधिक दंडाची वसुली केली आहे. त्यात विनातिकीट प्रवास करताना पकडल्या गेलेल्यांची संख्या १ लाख २८ हजार इतकी आहे. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन, सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. व्ही. एन. सुभाष यांच्या नेतृत्वाखाली  ही कारवाई करण्यात आली. अशा प्रकारची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याने प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा. अन्यथा, दंडाची वसुली केली जाईल. दंड न भरल्यास संबंधिताला कारागृहात पाठविले जाईल, असा इशारा रेल्वेकडून देण्यात आला आहे.

फुकटय़ांमध्ये १३ टक्के वाढ

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने यंदा एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत केलेल्या कारवाईत १ लाख २८ हजार फुकटय़ा प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून ७ कोटी १७ लाखांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये १ लाख १३ हजार फुकटय़ा प्रवाशांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून ६ कोटी २४ लाखांचा दंड वसूल केला होता. दोन्ही वर्षांची तुलना करता दंडाच्या वसुलीमध्ये संदा १५ टक्के, तर फुकटय़ा प्रवाशांच्या संख्येत १३ टक्क्य़ांनी वाढ झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: All pune railway passengers in pune region free travelling akp