पुणे : श्वानावर चुकीचे उपचार केल्याचा आरोप करुन एका डॅाक्टरकडून चार लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने पकडले नूतन पारगे, संदीप शिंगोटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका डॅाक्टरने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नूतन पारगे हिने पाळीव श्वानाला उपचारांसाठी डाॅक्टराकडे नेले होते. चुकीच्या उपचारांमुळे श्वानाचा मृत्यू झाल्याचा आरोप करुन पारगे आणि कथित पत्रकार शिंगोटे याने त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. डॅाक्टरने तडजोडीत चार लाख रुपये देण्याचे मान्य करुन खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली.

हेही वाचा >>> ‘बेस्ट’ची विजेवर धावणारी वातानुकूलित दुमजली बस लवकरच; पुण्यात चाचणी सुरू

हेही वाचा >>> नवरात्रोत्सवात नारळांना मागणी; दररोज दीड ते दोन लाख नारळांची आवक

खंडणी विरोधी पथकाने सापळा लावून पारगे आणि शिंगोटे यांना पकडले. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अभिजीत पाटील, उपनिरीक्षक विकास जाधव, हेमा ढेबे, संजय भापकर, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे आदींनी ही कारवाई केली.