पुणे : सिंहगड रस्ता भागात शनिवारी रात्री एका अल्पवयीन मुलाने त्याच्यावर गोळीबार झाल्याची माहिती दिल्यानंतर खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा घटनास्थळी पुंगळी सापडली नाही. मुलाने दिलेल्या माहितीवर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल परिसरात युवासेनेचे शहर प्रमुख निलेश गिरमे यांचे कार्यालय आहे. कार्यालयाच्या परिसरात दोन मुले थांबली होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी मुलावर गोळीबार केला. पिस्तुलातून गोळीबार झाल्यानंतर मुलगा वाकल्याने तो बचावला, अशी माहिती मुलाने पोलिसांना दिली.

Jerlyn Dsilva Pune
Jerlyn Dsilva Beaten In Pune : पुण्यामध्ये क्षुल्लक कारणावरून महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण; आरोपी अटकेत
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
rumor, Vishal Agarwal absconding, pimpri chinchwad police, porsche car accident
विशाल अगरवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार? पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला खूलासा…
man killed his sister in Pune Hadapsar police arrest the accused
धक्कादायक! पुण्यात भावाने केला बहिणीचा गळा दाबून खून, हडपसर पोलिसांनी आरोपीला केली अटक
Shocking video Water Increased in waterfall Many People Drowing In Water Scary Video
अवघ्या ५ सेकंदात मृत्यूनं गाठलं; संपूर्ण कुटुंब वाहून गेलं मात्र, ‘हा’ एक व्यक्ती मृत्यूच्या दाढेतून कसा बाहेर आला बघाच
young woman was coming down the stairs her foot slipped and she fell directly into the valley
‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ पायऱ्या उतरत होती तरुणी, पाय घसरला अन् थेट दरीत…,थरारक घटनेचा Video Viral
Yerawada, murder, Criminal,
पुणे : येरवड्यात वैमनस्यातून सराइत गुन्हेगाराचा खून, तिघांना अटक

हेही वाचा…धक्कादायक! पुण्यात भावाने केला बहिणीचा गळा दाबून खून, हडपसर पोलिसांनी आरोपीला केली अटक

मुलाने गोळीबार झाल्याची माहिती दिल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, उपायुक्त संभाजी कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, तसेच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाची चौकशी केली. घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा घटनास्थळी पुंगळी सापडली नाही. पुंगळी न सापडल्याने पोलिसांनी मुलाने दिलेल्या माहितीवर साशंकता व्यक्त केली आहे. याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.