पुणे : यासर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (CCMP) उत्तीर्ण झालेल्या बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदणी सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने सोमवारी जारी केले आहेत.
सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी इंडियन मेडिकल असोसिएशनने या निर्णयाचा निषेध करण्यासाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या महाराष्ट्र शाखेने मंगळवार (ता. ४) सकाळी ६ वाजल्यापासून ते बुधवार (ता. ५) सकाळी ६ वाजेपर्यंत राज्यभरात २४ तासांचा वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्धार केला आहे. यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे विभागानेही रात्री उशिरा प्रसिद्धी पत्रक जारी केले असून पुणे जिल्ह्यात वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे
शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, एमएमसीने सीसीएमपी पात्र डॉक्टरांची स्वतंत्र नोंदणी तातडीने सुरू करायची आहे. यासोबतच या डॉक्टरांची कार्यकक्षा, वैद्यकीय निष्काळजीपणाशी संबंधित प्रकरणांमधील कार्यपद्धती बरोबरच नैतिक नियमावली निश्चित करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला एका महिन्याच्या आत आपला सविस्तर अहवाल सरकारला सादर करावा लागणार आहे.
या निर्णयावर महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ. बहुबली शहा यांनी शासन निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याबरोबरच महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने नोंदणी प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणी केली आहे. परिषदेचे प्रशासक डॉ. विंकी रुघवाणी यांनी यांनी नोंदणीसोबतच निष्काळजीपणाच्या तक्रारी हाताळणे आणि नैतिकतेवर अहवाल देण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश मिळाले असून त्यानुसार पुढील कार्यवाही होईल.
असे सांगितले दरम्यान, सरकारच्या या निर्णयाविरोधात आयएमए महाराष्ट्र, मार्ड, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स आणि विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटना यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून राज्यभर वैद्यकीय सेवा बंदचा निर्णय घेतला आहे आय एम ए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी सांगितेल की, न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत सीसीएमपी डॉक्टरांची नोंदणी केली जाणार नाही, असे आश्वासन सरकारने आधी दिले होते. मात्र, आता अचानक आदेश काढल्यामुळे ॲलोपॅथीची गुणवत्ता, वैज्ञानिक आधार आणि रुग्णांच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
