आंबिल ओढा प्रकल्प बाधितांना महापालिके च्या सदनिकांमध्ये पर्यायी घरे

पुणे : आंबिल ओढा येथील एसआरए प्रकल्पात बाधित होणार असलेले जे नागरिक पर्यायी घरे स्वीकारण्यास तयार आहेत, त्यांना महापालिके च्या मिळकतींमध्ये (आर-७ योजनेअंतर्गत ताब्यात आलेल्या सदनिका)  घरे देण्यात येणार आहेत. त्यामुळे बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघाला आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी कात्रज तलाव, राजेश सोसायटी, लेकटाऊनसह अन्य भागांची पाहणी के ली. दांडेकर पूल परिसरातील आंबिल ओढय़ालगतच्या भूखंडावर झालेल्या कारवाईत बाधित झालेल्या नागरिकांचीही त्यांनी भेट घेतली. त्यानंतर महापालिके च्या मिळकतींमध्ये बाधितांना पर्यायी घरे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजनान थरकु डे, माजी गटनेता अशोक हरणावळ यांच्यासह आयुक्त विक्रम कु मार, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता सुष्मिता शिर्के , कार्यकारी अभियंता ललित बेंद्रे, विशाल तायडे यावेळी उपस्थित होते. आंबिल ओढा कारवाईत बाधित झालेल्या नागरिकांनी गोऱ्हे यांच्यापुढे समस्या मांडल्या. त्यानंतर गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलताना बाधितांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती दिली. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, आंबिल ओढय़ालगत राहणाऱ्या बाधित नागरिकांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार नाही. जे बाधित पर्यायी घरे स्वीकारण्यास तयार आहेत त्यांचे महापालिके च्या ताब्यात आलेल्या मिळकतींमध्ये स्थलांतर करण्यात येईल.

त्याबाबत आयुक्त विक्रम कु मार यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. महापालिके च्या ताब्यात आलेल्या मिळकतींची यादी प्रशासनाकडून देण्यात येणार आहे.  या यादीनुसार बाधित नागरिकांनी जागा निश्चित करावी. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबरही चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येकाला लेखी हमी त्यांच्याकडून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आंबिल ओढा सरळ करण्यासाठी काय करता येईल, याचा अभ्यास के ला जाणार आहे.