पिंपरी : मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांच्या घरात दिव्याला तेल नाही, अशा परिस्थितीत राज्यकर्ते दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम खात आहेत. सत्ताधारी असंवेदनशील असल्याची टीका विधान परिषदेचे माजी विराेधी पक्षनेते, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी केली. तसेच अल्पोपहार करण्यास हरकत नाही. परंतु, काजू-बदाम खाणाऱ्यांची नागरिकांनी हातात हंटर, रुमणे घेऊन सालपट काढली पाहिजे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. 

आमदार दानवे यांनी शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध गणेश मंडळे, शिवसेना शाखा, पदाधिकारी, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या गाठीभेट घेतल्या. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरप्रमुख चेतन पवार, आनंद ओव्हाळ, नाना शिंदे, नाथाभाऊ खांडेभरड, बाळकृष्ण जोशी, एकनाथ हाके, राजाराम तुपे, सुनील ओव्हाळ, राजू सोलापुरे, तुषार खर्चाने, अतुल कुदळे, विनोद जाधव, यकोब केंगार, नवनाथ शिंदे, भालचंद्र ढमाले, रफिक शेख, अण्णाराव बिराजदार, स्वप्निल शेवाळे, जतीन अवसरमल, अनिल सोमवंशी, दिलीप सावंत, संजय शिंदे, मोहन बारटक्के, लक्ष्मण निघुट, अरुण पात्रे, नितीन घोलप यावेळी उपस्थित हाेते.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये नांदेडमध्ये बैठक झाली. या बैठकीत  खासदार संजय जाधव यांची काजू-बदाम खातानाची चित्रफीत प्रसारित झाली आहे. ‘दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत असून त्यांच्या घरात दिव्याला तेल नाही, अशा परिस्थितीत राज्यकर्ते दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम खात आहेत. असे लाेकप्रतिनिधी लाेकांनी निवडून दिले आहेत, हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे. बैठकीत अल्पोपहार करण्यास हरकत नाही. परंतू, काजू-बदाम खाणा-यांची नागरिकांनी हातात हंटर, रुमणे घेऊन सालपट काढली पाहिजे. तसेच गाेरे इंग्रज नागरिकांवर अन्याय करत हाेते, त्याप्रमाणे सरकारमधील काळे-गाेरे इंग्रजासारखच वागत असल्याचा आराेपही दानवे यांनी केला. असंवेदनशील लाेकप्रतिनिधी लाेकांनी निवडून दिले आहेत, हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे.  गाेरे इंग्रज नागरिकांवर अन्याय करत हाेते, त्याप्रमाणे सरकारमधील काळे-गाेरे इंग्रजासारखच वागत असल्याचा आराेपही दानवे यांनी केला.

‘राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. विविध भागात दुष्काळ पडला आहे. या दुष्काळापासून मुक्ती मिळू दे, धो-धो पाऊस येऊ दे. आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना जनतेने नेस्तनाभूत करू दे, अशी गणराया चरणी प्रार्थना केली असल्याचे आमदार दानवे म्हणाले.