पुणे : तब्बल दोन वर्षांनंतर गोपाळकाला आणि दहीहंडी उद्या साजरी होत आहे. त्यामुळे यावर्षी अधिक उत्साहात दहीहंडी साजरी होणार. दहीहंडी फोडण्यासाठी रचल्या जाणाऱ्या मानवी मनोऱ्यांमुळे या उत्सवी उत्साहाला दु:खाचे गालबोट लागू नये यासाठी शहरातील खासगी रुग्णालयांच्या रुग्णवाहिका सेवांनी पुढाकार घेतला आहे. जखमी गोविंदांना अपघातानंतर पहिल्या एका तासात उपचार मिळावेत यासाठी ९८२२२६७१४० आणि ९८८१८६२०३० या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन लोकमान्य रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.

दहीहंडी या साहसी खेळादरम्यान उंचावरून खाली कोसळल्याने अनेक गोविंदा जखमी होतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास ते दगावण्याची शक्यताही असते. मात्र जखमी गोविंदांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या उद्देशाने पुण्यातील लोकमान्य रूग्णालयाने गोविंदांसाठी विशेष रुग्णवाहिकांची सुविधा ठेवण्यात आली आहे.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

लोकमान्य रुग्णालयाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण जोशी म्हणाले, शहरात १० रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत. अपघातग्रस्त गोविंदांवर उपचार करण्यास विलंब होऊ नये यासाठी ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. लोकमान्य रूग्णालयाचे संचालक आणि शल्यविशारद डॉ. नरेंद्र वैद्य म्हणाले, दहीहंडी फोडण्यासाठी रचलेले मानवी मनोरे कोसळल्याने दुखापत होते. हात किंवा पाय मोडणे, डोके, मान किंवा पाठीच्या मणक्याला दुखापत असे प्रकार गोविंदांमध्ये दिसुन येतात. दुखापतग्रस्त गोविंदाला योग्य प्रकारे हाताळले जाणे आणि तातडीचे उपचार यांमुळे गुंतागुंत टाळण्यास मदत होते. गोविंदांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णवाहिका अभियान हाती घेण्यात आल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.

रुग्णवाहिकेसाठी संपर्क

जखमी गोविंदांना अपघातानंतर पहिल्या एका तासात उपचार मिळावेत यासाठी ९८२२२६७१४० आणि ९८८१८६२०३० या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन लोकमान्य रुग्णालयाकडून करण्यात आले आहे. शहरात १० ठिकाणी रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे.