पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुणे पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवा पदक जाहीर झाले आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे हे या पदकाचे मानकरी ठरले आहेत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख, अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल हे पदक देऊन गौरविण्यात येते.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे, तसेच पुणे पोलीस दलातील सहायक फौजदार दिलीप झानपुरे, नितीन जगताप, राजस शेख, राजेंद्र पालांडे, सत्यवान साबळे, संतोष कुचेकर यांना अतिउत्कृष्ट सेवेबद्दल पदक जाहीर झाले आहे. सहपोलीस आयुक्त संजय दराडे, पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, स्वप्नाली शिंदे, उमेश गित्ते, उपनिरीक्षक अमित सिदपाटील, हवालदार अंकुश इंगळे, योगराज घाटगे, मच्छिंद्र भंडारे, सचिन अहिवळे, राहुल माने, संदीप पाटील, शैलेश सुर्वे, सत्यवान ढोंंबरे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पदक जाहीर करण्यात आले आहे. हनुमंत थोपटे, धनश्री कामठे यांच्यासह पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना हे पदक जाहीर करण्यात आले.
