scorecardresearch

Premium

काय भारत, काय इंडिया, माणूस म्हणायला लायक आहोत का? उज्जैन घटनेवर अमोल कोल्हे कडाडले

उज्जैनमध्ये बारा वर्षांच्या मुलीवर अत्याचार होऊन निर्घृण अवस्थेत फिरण्याची वेळ येते, अशावेळी इंडिया काय? भारत काय? माणूस म्हणायला लायक आहोत का? असा प्रश्न कोल्हे यांनी विचारला आहे.

Amol Kolhe on Ujjain incident
काय भारत, काय इंडिया, माणूस म्हणायला लायक आहोत का? उज्जैन घटनेवर अमोल कोल्हे कडाडले

उज्जैन येथील घटनेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे कडाडले. उज्जैनमध्ये बारा वर्षांच्या मुलीवर अत्याचार होऊन निर्घृण अवस्थेत फिरण्याची वेळ येते, अशावेळी इंडिया काय? भारत काय? माणूस म्हणायला लायक आहोत का? असा प्रश्न कोल्हे यांनी विचारला आहे. ते आळंदीमध्ये भागवत वारकरी संमेलनात बोलत होते.

अमोल कोल्हे म्हणाले, भागवत धर्मामध्ये स्त्रियांसाठीची मोकळीक सांगितली जाते. देशामध्ये पुन्हा एकदा सनातन धर्माच्या नावाखाली हिंदू धर्माचं वेगळं स्वरूप आणलं जात आहे. वेगळं स्वरूप आणणाऱ्यांना आरसा दाखवायला हवा. आपल्याला इतिहास नाकारता येत नाही. ज्या माऊलींच्या संजीवन समाधीच्या संदर्भात ज्या परिसरात वावरतो, त्या माऊलींच्या आई-वडिलांना संन्यास घ्यायला भाग पाडले कोणी? आणि माऊलींना वाळीत टाकलं कोणी? असा प्रश्न आजही उपस्थित होतो.

uddhav-thackeray-and-eknath-shinde
“पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये मदत करायचो”, मुख्यमंत्र्यांच्या विधानावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया, म्हणाले, “नशीब…”
Brijbhushan singh
“माझ्यावरील आरोप स्पॉन्सर्ड”, ब्रिजभूषण यांचा आरोप; काँग्रेसमधील पिता-पुत्रांचं नाव घेऊन म्हणाले, “कुस्तीवर…”
Gulabrao Patil on Sanjay Raut Khalistan issue
VIDEO: संजय राऊतांनी खलिस्तान आणि पुलवामाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याला गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…
Stray Dogs issue
भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचे थेट सुप्रीम कोर्टात पडसाद; जखमी वकिलावरून सुरू झाली चर्चा

हेही वाचा – शरद पवार हे नास्तिक नाहीत – खासदार श्रीनिवास पाटील

अमोल कोल्हे पुढे म्हणाले, तुकोबांची अभंगाची गाथा बुडवली कोणी? त्या संदर्भात अफवा उठवली कोणी? हा प्रश्न आजच्या काळात विचारला जातोय. म्हणून एक सत्य नाकारून चालत नाही. देश टिकला तर धर्म टिकतो. जर धर्म टिकवायचा असेल तर देश टिकवणे गरजेचं असते, देश टिकवण्यासाठी लोकशाही टिकवणे तेवढंच गरजेचं असते.

हेही वाचा – सलग सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची झुंबड; मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

इंडिया असो, भारत असो, हिंदुस्थान असो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं एवढंच असेल की, कुठल्याही नावाने म्हटलं जोपर्यंत माणसाला माणूस म्हणून ओळखल जाते नसेल, उज्जैनमध्ये बारा वर्षांच्या लेकीवर अत्याचार होऊन निर्घृण अवस्थेत फिरावं लागत असेल, इंडिया काय, भारत काय माणूस म्हणायला लायक आहोत का? याचा विचार करायला हवा. वारकरी संप्रदायाचे मोठं योगदान आहे ते प्रबोधनाचे. त्या प्रबोधनाच्या माध्यमातून जाती, धर्म, पंत याचे सगळे भेद बाजूला ठेवून पुन्हा एकदा मानवतेचा संदेश जात आहे, असे कोल्हे म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amol kolhe comment on ujjain incident kjp 91 ssb

First published on: 01-10-2023 at 18:29 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×