कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान सुरू झाले आहे. नवमतदार ते ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी बाहेर पडू लागले आहेत. अशातच मतदानाच्या सकाळच्या सत्रात अनोखी बाब निदर्शनास आली. लंडन येथे वास्तव्याला असलेल्या अमृता देवकर- महाजन यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुण्यात येऊन मतदानही केले.

हेही वाचा- “जनता माझ्या पाठीशी, त्यांचे आंदोलन म्हणजे स्टंटबाजी”; हेमंत रासने यांचा रविंद्र धंगेकरांना टोला

Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Gosht Punyachi
गोष्ट पुण्याची-भाग ११८:पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकेकाळी होती १८ एकरची प्रशस्त ‘नातूबाग’
Nandurbar district bus conductors murder solved son-in-law killed father-in-law due to a family dispute
सासऱ्यासाठी जावईच काळ, नंदुरबार जिल्ह्यातील बस वाहकाच्या हत्येची उकल

अमृता देवकर-महाजन सध्या लंडन येथे वास्तव्याला आहेत. मात्र त्या मुळच्या पुण्याच्या आहेत आणि कसबा पेठेत त्यांचे घर आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्याने त्यांनी मतदानासाठी पुण्याला यायचा निर्णय घेतला. त्यानुसार त्या रविवारी पहाटे मुंबईत दाखल झाल्या. त्यानंतर मुंबई ते पुणे प्रवास करून त्यांनी घरी जाण्यापूर्वी कसब्यातील मतदान केंद्र गाठले. त्यांचे बंधू विक्रांत देवकर यांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावला.