scorecardresearch

Premium

“देहविक्रीला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता द्या”, अमृता फडणवीसांची पुण्यात मागणी

अमृता फडणवीस यांनी भारतात देखील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता देण्याची सरकारकडे मागणी केली.

Amruta Fadnavis on Prostitution in India
अमृता फडणवीसांकडून देहविक्रीला व्यवसाय म्हणून मान्यता देण्याची मागणी…

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यांनी भारतात देखील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता देण्याची सरकारकडे मागणी केली. तसेच इतर व्यवसायांप्रमाणे देहविक्री व्यवसायाला सन्मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्या पुण्यात शनिवारी (११ जून) दुपारी १ वाजता बुधवार पेठेतील महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व मुलींसाठी सुकन्या कार्डचे वाटप कार्यक्रमात आल्या होत्या. यावेळी देहविक्री व्यवसायातील महिलांसमोर त्या बोलत होत्या.

अमृता फडणवीस म्हणाल्या, “मी सरकारला असंच सांगेन की जसा इतर व्यवसायांना सन्मान असतो, त्याप्रमाणे देहविक्री व्यवसायाला देखील आदर मिळाला पाहिजे. त्याला एक व्यवसाय म्हणून स्विकारलं पाहिजे. जर्मनीसारख्या देशांमध्ये देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांचं आदरणीय स्थान आहे. देहविक्री व्यवसाय करणारे या देशांमध्ये कर देखील भरतात. तेच स्थान आपण सर्वजण एकत्र आलो तर भारतात देखील मिळू शकतं. मी या निर्णयाच्या पाठीशी आहे.”

BEML Recruitment 2023
ITI, डिप्लोमा आणि B.Sc उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु, आजच अर्ज करा
HPCL Bharti 2023
‘या’ उमेदवारांना हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची मोठी संधी! पदानुसार ६० हजारांहून अधिक पगार मिळणार
Asha workers protest in Panvel
पनवेल : सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळण्यासाठी आशा वर्करची निदर्शने
rohit pawar criticized maha government
…तर सरकार कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या! रोहित पवार असे का म्हणाले? जाणून घ्या

“देहविक्री व्यवसायातील महिलांनी दैनंदिन वैद्यकीय तपासणी करावी”

“तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे कितीही घाई असेल तर देहविक्री व्यवसायातील महिलांनी आपली वैद्यकीय तपासणी करावी. तुम्ही ज्या व्यवसायात आहात त्यात काही आजार होण्याचा धोका असतो, तो धोका ओळखा. तसेच नियमितपणे आपली तपासणी करून घ्या. त्यासाठी तुमच्यामागे भारतीय जनता पक्ष उभा आहे,” असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

“आपल्या मुलांसाठी बचत करायला विसरू नका”

अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, “आपल्या मुलींना शिकवा. आपल्या मुलांसाठी बचत करा. त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. वृद्धापकाळात वृद्धाश्रमाची गरज असते. त्यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करू. मात्र, तुम्ही देखील आपल्या मुलांसाठी बचत करायला विसरू नका.”

हेही वाचा : ‘अब देवेंद्र अकेला नही है’ म्हणत अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल; म्हणाल्या…

“बुधवार पेठेतील तुमच्या भागात हवं तिथं योगा क्लासेस उपलब्ध करून देऊ”

“योगा करणं सर्वांनी गरजेचं आहे. तुम्ही सर्वजण तयार असाल तर मी तुमच्यासाठी चांगले प्रशिक्षक आणून तुमचे योगा सेशन घेईन. तुम्ही हा योगा घरी केला तर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तंदुरुस्त राहाल. आम्ही बुधवार पेठेतील तुमच्या भागात हवं तिथं योगा क्लासेस उपलब्ध करून देऊ,” असंही अमृता फडणवीसांनी नमूद केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amruta fadnavis demand permission to prostitution as profession in india pbs

First published on: 11-06-2022 at 17:45 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×