An engineer killed his wife due to suspicion of character in Hadapsar area | Loksatta

चारित्र्याच्या संशयातून अभियंत्याकडून पत्नीचा खून; पुण्यातील हडपसर भागातील घटना

चारित्र्यावरून संशय घेत अभियंता आपल्या पत्नीचा छळ करत होता. याच संशयावरून त्याने पत्नीवर चाकून वार केल्याची माहिती मिळाली आहे.

चारित्र्याच्या संशयातून अभियंत्याकडून पत्नीचा खून; पुण्यातील हडपसर भागातील घटना
नांदण्यास नकार देणाऱ्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार ; हडपसर भागातील घटना (संग्रहित छायचित्र)

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन अभियंत्या पतीने चाकूने वार करुन तिचा खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी पतीस हडपसर पोलिसांनी अटक केली. ज्योती राजेंद्र गायकवाड (वय २८, रा. गुरुदत्त कॉलनी, भेकराईनगर, हडपसर ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती राजेंद्र भाऊराव गायकवाड (वय ३१) याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा- पुणे : हरियाणातल्या विद्यार्थिनीचे कपडे फाडून विनयभंग; सहकारी विद्यार्थीच आरोपी

गायकवाड खासगी कंपनीत अभियंता आहे. तो चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा छळ करत होता. सोमवारी (५ डिसेंबर) सकाळी त्यांच्यात वाद झाले. त्याने चाकूने ज्योतीवर वार केले. या घटनेची माहिती रहिवाशांनी हडपसर पाेलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्योतीचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी राजेंद्रला ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 17:57 IST
Next Story
पुणे : हरियाणातल्या विद्यार्थिनीचे कपडे फाडून विनयभंग; सहकारी विद्यार्थीच आरोपी