An excursion school bus children fell into a valley in Lohgad area pune | Loksatta

पुणे: लोहगड परिसरात शालेय मुलांच्या सहलीची बस दरीत कोसळली; विद्यार्थी किरकोळ जखमी

पेन येथील साठे क्लासमधील ७२ मुले व शिक्षक शालेय बसने लोहगड येथे सहलीसाठी आले होते. लोहगड येथून खाली उतरताना बस दरीत कोसळली.

पुणे: लोहगड परिसरात शालेय मुलांच्या सहलीची बस दरीत कोसळली; विद्यार्थी किरकोळ जखमी
लोहगड परिसरात शालेय मुलांच्या सहलीची बस दरीत कोसळली

दुधीवरे खिंडीजवळ लोहगड घेरेवाडीकडील उतारावर एक शाळकरी मुलांची बस ६० ते ७० फुट खोल दरीत कोसळल्याची घटना रविवारी संध्याका‌ळी घडली. या अपघातात काही विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

हेही वाचा- अपंगांना स्वावलंबी बनवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेची कौशल्य प्रशिक्षण योजना

पेन येथील साठे क्लासमधील ७२ मुले व शिक्षक शालेय बसने लोहगड येथे सहलीसाठी आले होते. त्यापैकी एक बस ( क्रमांक एमएच ०६ एस ९३८१) ही लोहगड येथून खाली उतरताना दरीत कोसळली. या अपघातात बहुतांश विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. सात ते आठ जणांना अधिक मार लागला आहे. विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

हेही वाचा- पुणे: माॅडेल काॅलनीत भरदिवसा घरफोडी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास

अपघाताची माहिती समजताच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे् पोलीस पथक, शिवदुर्ग टीम, लोहगड, घेरेवाडी व औंढोली येथील पोलीस मित्र, पर्यटक यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केले. बचावासाठी शिवदुर्ग टीम लोणावळा लोहगड घेरेवाडी येथील स्थानिक तरुण, सरपंच नागेश मरगळे, पोलीस पाटील सचिन भोरडे, उपसरपंच गणपत महाराज ढाकोळ, लक्ष्मण साबळे, दत्तू विखार, रवी मानकर, भरत भोरडे, पंढरी विखार, मयूर ढाकोळ,चेतन विखार, बाळू गवारी व इतर उपस्थित होते.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 20:12 IST
Next Story
पुणे: बांधकाम व्यावसायिकाकडे आभासी चलनाद्वारे आठ कोटी ३० लाखांची खंडणीची मागणी