scorecardresearch

पुणे : शारिरिक तंदुरुस्तीचे ऑनलाइन प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीकडे सात कोटींची खंडणी

कंपनीकडून ॲपद्वारे शारीरीक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी प्रशिक्षण दिले जाते.

पुणे : शारिरिक तंदुरुस्तीचे ऑनलाइन प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीकडे सात कोटींची खंडणी
( संग्रहित छायचित्र )

शारीरीक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी ऑनलाइन प्रशिक्षण देणाऱ्या कंपनीविषयी बदनामीकारक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करुन कंपनीच्या संचालकांकडे सात कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी अमन दुग्गल (वय २८, रा. कोरेगाव पार्क) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जितेंद्र शिवदयाल चोक्सी (वय ३६, रा. परिजात, विमाननगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जितेंद्र चोक्सी यांची स्कॉट फिटनेस नावाची कंपनी आहे. कंपनीकडून ॲपद्वारे शारीरीक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी प्रशिक्षण दिले जाते. आरोपी अमन दुग्गल याने चोक्सी यांच्या कंपनीविषयी समाजमाध्यमावर बदनामीकारक ध्वनिचित्रफीत प्रसारित केली.

त्यानंतर दुग्गलने चोक्सी यांच्याकडे सात कोटी रुपयांची खंडणी मागितली. समाजमाध्यमावर बदनामीकारक मजकूर प्रसारित करून खंडणीसाठी धमकावले. चोक्सी यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर दुग्गल याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: An extortion of 7 crores to a company providing online fitness training pune print news amy

ताज्या बातम्या