scorecardresearch

Premium

पुण्यात उद्या अघोषित बंदची चर्चा ,मराठा क्रांती मोर्चाकडून उपोषण; काही भागात बंदची हाक

जालना येथील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या मागण्या राज्य सरकारने तातडीने मान्य कराव्यात.

maratha morcha
मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीसाठी नेमलेली समिती 'या' तारखेपासून मराठवाडा दौऱ्यावर

पुणे : जालना येथील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या मागण्या राज्य सरकारने तातडीने मान्य कराव्यात. यासह समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (१४ सप्टेंबर) पुण्यात मराठा क्रांती मोर्चाकडून सकाळी दहा वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. मात्र, गुरुवारी शहरात अघोषित बंद पुकारण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून बंद नसल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी शहराच्या बाणेर, बालेवाडी, बोपोडी, औंध या भागांत बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जालना येथील आंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाकडूनही बुधवारी भूमिका स्पष्ट करण्यात आली.

आगामी काळातील गणेशोत्सव लक्षात घेता व्यावसायिक नुकसान टाळण्यासाठी पुणे बंद ऐवजी लाक्षणिक उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. गुरुवारी शहरातील बाणेर, बालेवाडी, बोपोडी, औंध या भागांत बंदची हाक देण्यात आली होती. तेथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांबरोबर संपर्क साधून त्याठिकाणचे सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू राहतील, याची काळजी घेतली जाणार आहे. याशिवाय, हडपसरमधील बंद मागे घेण्यात आला असून उपोषण आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
29 villages dispute in Vasai-Virar
वसई-विरारमधील २९ गावांचा वाद : गावे समाविष्ट करण्याच्या नव्या निर्णयाला नव्याने आव्हान द्या, विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाची सूचना
Ramdas Tadas
वर्धा : भाजप खासदार रामदास तडस यांचे एक्स खाते हॅक, पोलिसांत तक्रार दाखल
Jalgaon people morcha
या मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी जळगाव दुमदुमले, प्रलंबित प्रश्‍नांसाठी लोकसंघर्षचा बिर्‍हाड मोर्चा

हेही वाचा >>>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या ‘त्या’ विधानाचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध

राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एक चित्रफीत प्रसारित झाली आहे. त्यात समाजाला गृहीत धरण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लाक्षणिक उपोषणाच्या वेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा निषेध केला जाणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र त्यानंतरही शहर बंद असल्याचे वृत्त बुधवारी रात्री समाजमाध्यमातून प्रसारित झाले. बाणेर, बालेवाडी, बोपोडी, औंध भागातील दुकाने, शाळा बंद राहणार असल्याचे समाजमाध्यमातून सांगण्यात आले. काही ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नसल्याचेही जाहीर करण्यात आले. तर काही शाळातील क्रीडा स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत.

बंद पुकारण्यात आलेला नाही. बाणेर, बालेवाडी, बोपोडी, औंध या भागांत बंद आहे. मात्र तेथील व्यवहार सुरळीत राहतील. अन्य ठिकाणी बंद नसून पदाधिकारी केवळ उपोषणाला बसणार आहेत.-राजेंद्र कोंढरे ,समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: An undeclared bandh is being discussed in pune tomorrow and the maratha kranti morcha is on a fast pune print news apk 13 amy

First published on: 13-09-2023 at 21:47 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×