सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची माहिती आता अॅपल आणि अँड्रॉईड फोनवरही उपलब्ध होणार आहे. ‘अॅप्टिटय़ूड टेकडी वेब सोल्यूशन्स’ ने सवाई २०१३ हे विनामूल्य अॅप्लिकेशन तयार केले असून यावर्षी फेसबुक आणि ट्विटरचाही या अॅप्लिकेशनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे यावर्षी एकसष्ठावे वर्ष आहे. देश-विदेशातून या महोत्सवामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रसिकांसाठी महोत्सवाची माहिती आता फोनवरही उपलब्ध होणार आहे. या महोत्सवाची माहिती देणारे ‘सवाई २०१३’ हे अॅप्लिकेशन ‘अॅप्टिटय़ूड टेकडी वेब सोल्यूशन्स’ ने तयार केले आहे. महोत्सवाचे वेळापत्रक, कलाकारांची महिती, फोटो या गोष्टी या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. यावर्षी या अॅप्लिकेशनमध्ये फेसबुक आणि ट्विटरचाही समावेश करण्यात आला आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून महोत्सवाचे अनुभव, फोटो सोशल नेटवर्किंग साईट्सवर अपलोड करणे अधिक सोपे होणार आहे.
अँड्रॉईड अॅप, गुगल प्ले स्टोअरमध्ये ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव २०१३’ या नावाने उपलब्ध आहे. अॅपल आय पॅड, आय फोन, ब्लॅकबेरी वापरणाऱ्यांसाठी २ं६ं्र2013.३ी‘्िर.ल्ली३ या लिंकवर हे अॅप्लिकेशन उपलब्ध आहे.