scorecardresearch

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवर चंद्रकांत पाटील यांचं सूचक विधान; म्हणाले, “आज…”

सहा तारखेला उमेदवार अर्ज दाखल केला जाणार आहे. अशी माहिती भाजपचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

chandrakant patil pune chinchwad election
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुणे: कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा दिल्ली येथून आज संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे. तसेच सहा तारखेला उमेदवार अर्ज दाखल केला जाणार आहे. अशी माहिती भाजपचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक होत आहे. ही निवडणुक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आठवले गट यांच्या सह विविध संघटना आणि कसबा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांची बैठक झाली.

हेही वाचा >>> चिंचवड पोटनिवडणूक: महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे लढण्याची शक्यता?, राहुल कलाटे यांचे पुन्हा जगतापांना आव्हान!

त्या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत आजपर्यंत अनेक वेळा बैठका झाल्या आहेत. या दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे. यासाठी भाजपकडून सर्व पक्षाच्या नेत्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. तसेच या करीता राजकीय रणनीतीकार म्हणून आमदार माधुरी मिसाळ यांची सर्व पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्या सर्व नेत्यांशी संवाद साधत आहे. त्याच दरम्यान आमच्याकडून केंद्रीय समितीकडे इच्छुक उमेदवारांची नाव पाठविण्यात आली असून आज संध्याकाळपर्यंत नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत गाफिल राहाता कामा नये. त्या दृष्टीने आम्ही निवडणुकीची तयारी केल्याचं त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 13:22 IST