scorecardresearch

पुणे : ‘अरे आव्वाज कुणाचा’च्या घोषणांमध्ये ‘पुरुषोत्तम’च्या प्राथमिक फेरीला सुरुवात

सर परशुरामभाऊ महविद्यालयाच्या ‘सिन्स यू आर हिअर’ या एकांकिकेने सायंका‌ळी पाच वाजता प्राथमिक फेरीची सुरुवात झाली.

पुणे : ‘अरे आव्वाज कुणाचा’च्या घोषणांमध्ये ‘पुरुषोत्तम’च्या प्राथमिक फेरीला सुरुवात
( सर परशुरामभाऊ महविद्यालय )

रंगभूषा करून घेण्यामध्ये व्यग्र युवा कलाकार, रंगमंचावर पहिले पाऊल ठेवण्यासाठी नवोदितांनध्ये असलेला उत्साह आणि मनामध्ये धाकधूक, आपल्या महाविद्यालयाच्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आलेली तरुणाई आणि ‘अरे आव्वाज कुणाचा’ या घोषणांच्या निनादासह तरुणाईच्या सळसळत्या जल्लोषात ‘पुरुषोत्तम’च्या प्राथमिक फेरीला रविवारी सुरुवात झाली.

महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे आयोजित ५७ व्या पुरूषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरी रविवारपासून सुरू झाली. जोश आणि जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीने भरत नाटय मंदिर आवार फुलून गेले होते. मोठ्या उत्साहात महाविद्यालयीन संघाच्या युवा कलाकारांनी प्रेक्षकांसमोर केलेल्या सादरीकरणाला भरभरून दाद मिळाली. युवा कलाकारांचा अभिनय आणि एकांकिकांची मांडणी रसिकांची मने जिंकून गेली.

सर परशुरामभाऊ महविद्यालयाच्या ‘सिन्स यू आर हिअर’ या एकांकिकेने सायंका‌ळी पाच वाजता प्राथमिक फेरीची सुरुवात झाली. कावेरी महाविद्यालयाची ‘गुमनाम है कोई?’ आणि बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाची ‘भू-भू’ या एकांकिका सादर झाल्या. नावीन्यपूर्ण विषयांची समर्पक मांडणी आणि नेपथ्यापासून ते अभिनयापर्यंत प्रत्येक एकांकिकेमध्ये वेगळेपण पाहायला मिळाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या