scorecardresearch

Premium

सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; पत्रात ललित पाटील प्रकरणाची धक्कादायक माहिती असल्याचा दावा

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना नाशिकहून निनावी पत्र आले आहे.

Anonymous letter from Nashik to Sushma Andhare deputy leader of the Thackeray faction in the drug trafficker Lalit Patil case pune news
सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र ; पत्रात ललित पाटील प्रकरणाची धक्कादायक माहिती असल्याचा दावा

पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना नाशिकहून निनावी पत्र आले आहे. या पत्रात धक्कादायक माहिती असल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे. अंधारे यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. या पत्रात दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांकडे हे पत्र दिले आहेपोलीस आयुक्त रितेश कुमार यांची सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी भेट घेतली. ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यावेळी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर अंधारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नाशिकवरून एक निनावी पत्र आले आहे. त्यात काही राजकीय आणि इतरांची नावे आहेत. मात्र, त्याबाबतचे पुरावे नाहीत. त्यामुळे हे पत्र पोलीस आयुक्तांकडे देण्यात आले आहे. ललित पाटील प्रकरणाचा तपास करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच येरवडा कारागृहातून त्याला बाहेर ससून रूग्णालयातून कोणी दाखल करण्यासाठी कोणी प्रयत्न केले. ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांची चौकशी व्हायला हवी, असे अंधारे यांनी सांगितले.अमली पदार्थ विक्री गंभीर प्रकरण आहे. काही दिवसांपूर्वी मी समाजमाध्यमात एक ध्वनिचित्रफीत प्रसारित केली होती. त्या ध्वनिचित्रफितीत न्यायालयातून ससूनमध्ये नेण्यात येणाऱ्या कैद्यांना बंदोबस्तावरील पोलीस पाकीट देत असल्याचे आढळून आले होते. याप्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती, असे त्यांनी नमूद केले.

Inspection of records in land records office by police in case of arrest of KDMC urban planning staff
कडोंमपा नगररचना कर्मचारी अटक प्रकरणात पोलिसांकडून भूमि अभिलेख कार्यालयातील अभिलेखांची तपासणी
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?
Sheena Bora murder case CBI applies to special court to stay documentary on Indrani Mukherjee
शीना बोरा हत्याकांड : इंद्राणी मुखर्जीवरील माहितीपटाला स्थगिती द्या, सीबीआयचा विशेष न्यायालयात अर्ज
case registered against the staff and officials of vetik hospital for beating dog
ठाणे: श्वानाला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anonymous letter from nashik to sushma andhare deputy leader of the thackeray faction in the drug trafficker lalit patil case pune print news rbk 25 amy

First published on: 02-12-2023 at 05:58 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×