scorecardresearch

Premium

पुणे : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, मोटारीच्या धडकेने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

कात्रज बाह्यवळण मार्गावर मोटारीच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ललिता विजय बोरा (वय ६५, रा. आंबेगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी महिलेचे नाव आहे.

accident near Navale bridge
पुणे : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, मोटारीच्या धडकेने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : कात्रज बाह्यवळण मार्गावर मोटारीच्या धडकेने पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ललिता विजय बोरा (वय ६५, रा. आंबेगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालक अनिरुद्ध खैरनार (रा. डोंबिवली, जि. ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी अविनाश रेवे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – धक्कादायक! ‘लेझर बीम’मुळे पुण्यात १५ जणांच्या डोळ्यांना इजा, पुण्यातील विविध रुग्णालयांत नोंद; कायमस्वरुपी दृष्टी जाण्याचा धोका

patholes death
महामार्गावरील खड्डय़ामुळे महिलेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
vehicle hit an elderly person
मुंबई : वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
central railway nagpur, central minister nitin gadkari, compassionate employment in central railway
वडिलांचा मृत्यू, भाऊ दगावला…गडकरींचा पाठपुरावा…अन मध्य रेल्वेकडून महिलेला…
building collapse in Dombivli,
डोंबिवलीत इमारत कोसळून एकाचा मृत्यू; एका महिलेला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढले

हेही वाचा – पिंपरी : आंदोलनाच्या गुन्ह्यात खासदार बारणे यांच्यासह चौघे निर्दोष

बोरा या कात्रज चौक ते नवले पूल दरम्यान असलेल्या बाह्यवळण मार्गावरुन निघाल्या होत्या. आंबेगाव बुद्रुक परिसरात त्या रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या बोरा यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मोहन देशमुख तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Another accident near navale bridge elderly woman died after being hit by a car pune print news rbk 25 ssb

First published on: 03-10-2023 at 11:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×