पुणे : कल्याणीनगर अपघातप्रकरणी चर्चेत असलेल्या सुरेंद्र अगरवाल आणि विशाल अगरवाल या पिता-पुत्रासह पाच जणांवर बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अगरवाल पिता-पुत्राच्या अडचणींत आणखी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.

सावकारी कर्जाला कंटाळून वडगाव शेरी येथे राहणाऱ्या ४१ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने ९ जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी विनय विष्णुपंत काळे याच्यावर जानेवारीत महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्ह्याच्या तपासात सुरेंद्रकुमार अगरवाल, रामकुमार अगरवाल, विशाल अगरवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवी हुडलानी आणि मुकेश झेंडे यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर भादंवि ३०६, ५०४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती चंदनगर पोलिसांनी दिली.

Anant Radhika Wedding
अंबानींच्या लग्नात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिल्याप्रकरणी अभियंत्याला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
Deepali Chavan suicide case, forest officer Deepali Chavan, lady singham forest officer Deepali Chavan, investigation of forest officer Deepali Chavan suicide case, investigation of Deepali Chavan suicide case stalled, vishleshan article, loksatta explain
‘लेडी सिंघम’ वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास का रखडला? प्रकरण बंद करण्याचा प्रयत्न?
case has been registered in the death of two children due to suffocation in a motor vehicle
मुंबई : मोटरगाडीमध्ये गुदमरून दोन बालकांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
Chandrapur, Accused in Aarti Chandravanshi Murder Case, accused in murder case Suicide in Custody, Police Officers Suspended, murder news,
आनंदवन हत्या प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
jalgaon stone pelting marathi news,
जामनेर पोलीस ठाण्यावर जमावाची दगडफेक, जाळपोळ; बालिका हत्या प्रकरणातील संशयितास ताब्यात देण्याची जमावाची मागणी
Mumbai, Fraud, builder,
मुंबई : ड्रग्सच्या नावाखाली बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक
Navi Mumbai, Rabale Police Station, Registers Case Against Three, Attempted Murder, Dispute Over Police Complaint, crime news, navi Mumbai news,
नवी मुंबई : क्षुल्लक कारणावरून हत्येचा प्रयत्न; गुन्हा दाखल
Murder, Murder in Vasai, Boyfriend Stabs Girlfriend to Death, Boyfriend Stabs Girlfriend Iron Spanner, Bystanders Film Incident of murder in vasai,
वसईत भररस्त्यात प्रेयसीची हत्या, वाचवण्याऐवजी व्हिडिओ काढण्यात लोक मग्न

हेही वाचा >>>पुणे मेट्रो सुसाट…! स्वारगेटपर्यंत धावण्याचा मुहूर्त अखेर ठरला

शशिकांत दत्तात्रय कातोरे (वय ४१, रा. गार्डेनिया सोसायटी, वडगाव शेरी) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी दत्तात्रय साहेबराव कातोरे (वय ६९) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनय काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शशिकांत यांचा ‘सद्गुरू इन्फ्रा’ या नावाने व्यवसाय होता. त्यांना व्यवसायासाठी बँकेचे कर्ज आवश्यक होते. त्याकरिता ते बँकेच्या शोधात होते. याच काळात काळे आणि शशिकांतची ओळख झाली. त्याने ‘तुम्ही बँक कर्जाच्या भानगडीत पडू नका. मी तुम्हाला पैसे देतो. तुम्ही मला त्यावर पाच टक्क्यांच्या हिशेबाने परतावा द्या’ असे सांगितले. शशिकांत याने काळे यांच्याकडून कर्ज घेतले होते. त्याला ठरल्याप्रमाणे पाच टक्केप्रमाणे वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरूपात पैसे दिले. काही महिन्यांपूर्वी शशिकांत यांनी नवीन साइट सुरू करण्यासाठी काळेकडून परताव्याच्या पाच टक्के दराने पुन्हा पैसे घेतले. परंतु, ही साईट चालू झाली नाही. त्यानंतर काळे याने या रकमेवर चक्रवाढ व्याज लावण्यास सुरुवात केली. या सर्व पैशांची मागणी सुरू केली. शशिकांतच्या घरी जाऊन त्यांना ‘आम्हाला पैसे दिले नाही तर, तुम्हाला तुरुंगात पाठवतो’ अशी धमकी दिली. याला कंटाळून शशिकांत कातोरे यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.