पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल आणि त्याचे वडील सुरेंद्र यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. कोंढवा भागातील जमीन व्यवहारात कुख्यात गुन्हेगार छोटा राजनचे नाव सांगून एक कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अगरवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र ब्रह्मदत्त अगरवाल (वय ७७), मुलगा विशाल (वय ५०), जसप्रीतसिंग राजपाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुश्ताक शब्बीर मोमीन (वय ४५, रा. कौसरबाग, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुश्ताक मोमीन यांची एम. एम असोसिएट्स आणि वास्तू प्रॉपर्टीज एजन्सी आहे. मोमीन यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवून देणे, तसेच जमीन खरेदी-विक्री व्यवहार करण्यात येतात. आरोपी अगरवाल आणि जसप्रीतसिंग राजपाल यांचे कोंढव्यातील ब्रह्मा काऊंटी सोसायटीच्या परिसरात असलेल्या जमिनीवरून निवृत्ती कोपरे यांच्याशी वाद झाले होते. अगरवाल जुलै २०१९ मध्ये माेमीन यांना भेटले. जमिनीचा वाद मिटवून देणार का, अशी विचारणा केली. त्या वेळी परवानगी, तसेच अन्य कामे मार्गी लावून वाद मिटवून देतो, असे मोमीन यांनी त्यांना सांगितले.

abortion pills illegally sale in vasai
बेकायदेशीर विक्री, तरुणींच्या जीवाला धोका; वसई विरार शहरात गर्भपात गोळ्यांचा काळाबाजार
Charge sheet filed in Salman Khan house firing case
सलमान खानच्या घरावरील गोळीबाराप्रकरणी आरोपपत्र दाखल
Highly educated youth arrested for murdering his wife due to suspicion of character and filing a false complaint pune print news
चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करून खोटी तक्रार देणारा उच्चशिक्षित तरुण गजाआड; शिरूरमधील रांजणगाव सांडसमधील घटना
minor boy was injured by hitting floor on his head at Childrens Reformatory in Yerawada
येरवड्यातील बालसुधारगृहात राडा; डोक्यात फरशी घातल्याने अल्पवयीन मुलगा जखमी
mla dr deorao holi complaint ias officer shubham gupta to chief minister
अखेर ‘त्या’ वादग्रस्त आयएएस अधिकाऱ्याची चौकशी होणार, आमदाराच्या तक्रारीवरून दोन वर्षानंतर…
Chandrapur, Accused in Aarti Chandravanshi Murder Case, accused in murder case Suicide in Custody, Police Officers Suspended, murder news,
आनंदवन हत्या प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
fraud, youth, lure job,
सोलापूर : स्टेट बँकेतील नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला आठ लाखांचा गंडा, जालन्याच्या दाम्पत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा
Hit and run case in nagpur court again gives relief to the accused ritu malu husband
नागपुरातील हिट अँड रन प्रकरण : आरोपीच्या पतीला न्यायालयाकडून पुन्हा दिलासा

हेही वाचा – ससूनमधील डॉक्टरांसह चौघांना न्यायालयीन कोठडी, कल्याणीनगर अपघात प्रकरण

या प्रकरणात मध्यस्थी केल्यास दीड कोटी रुपये देण्याचा करार करण्यात आला होता. अगरवाल आणि राजपाल यांनी मोमीन यांना हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी १८ लाख रुपये आगाऊ दिले होते. उर्वरित एक कोटी ३२ लाख रुपये जमिनीसंदर्भातील कामे पूर्ण झाल्यानंतर देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले होते. मोमीन यांनी अगरवाल यांना जागेचा कायदेशीर ताबा मिळवून दिला. ३१ जुलै रोजी कोपरे कुटुंबीय आणि सुरेंद्र अगरवाल यांच्यात करारनामा झाला. मोमीन यांनी जमिनीच्या परिसरात सीमाभिंत बांधली. तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दिले. अगरवाल यांनी दिलेले १८ लाख रुपये खर्च झाल्याने मोमीन यांनी अगरवाल आणि राजपाल यांच्याकडे उर्वरित पैशांची मागणी केली. तेव्हा आरोपींनी मोमीन यांना लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर असलेल्या कार्यालयात बोलावून घेतले. ‘तुला आणि तुझ्या कुटुंबीयांना जगायचे आहे का? जेवढे पैसे दिले आहेत. त्यावर समाधान मान अन्यथा खंडणीचा गुन्हा दाखल करून तुला तुरुंगात पाठवू’, अशी धमकी अगरवाल यांनी मोमीन यांना दिली. त्यावर मोमीन यांनी पोलीस आयुक्तालयात तक्रारअर्ज दिला. त्यानंतर अगरवाल आणि जसपाल यांनी पुन्हा मोमीन यांना बोलावून घेतले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा – ‘ससून’च्या उपाहारगृहातील कामगाराचा जामीन अर्ज फेटाळला, अमली पदार्थ तस्करी प्रकरण

मोमीन यांनी लष्कर न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली. तेव्हा मोमीन यांना पुन्हा धमकावण्यात आले. दि. ३ मार्च २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयात मोमीन आणि अगरवाल यांची भेट झाली. तिथे न्यायालयाच्या इमारतीवरून फेकून देण्याची धमकी त्यांना देण्यात आली. दरम्यान, ‘छोटा राजनशी आमचे थेट संबंध आहेत. अजय भोसलेवर गोळीबार झाल्याची घटना माहिती आहे ना? तो वाचला, तू वाचणार नाहीस’, अशी धमकी अगरवाल पिता-पुत्राने दिल्याचे मोमीन यांनी फिर्यादीत म्हटले आहे.