शेअर दलालाचे २० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी गुंड गज्या मारणे टोळीतील सराईतास गुन्हे शाखेने पकडले. सिंहगड रस्ता परिसरात ही कारवाई करण्यात आली.मयूर राजेंद्र निवंगुणे (वय २४ रा. वसंत प्लाझा, नऱ्हे) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. शेअर दलालाच्या अपहरण प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मारणे टोळीचा म्होरक्या गजानन उर्फ गज्या मारणेचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शेअर दलालाचे अपहरण करुन वीस कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गज्या मारणेसह साथीदारांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक
Details of election bonds held by pharmaceutical companies Worrying
लेख: रोखे घेऊन औषध कंपन्या तंदुरुस्त!

खंडणी प्रकरणातील आरोपी निवंगुणे सिंहगड रस्ता परिसरातील नवले पुलाजवळ येणार असल्याची माहिती दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी सुमित ताकपेरे यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, सहायक फौजदार शाहीद शेख, हवालदार निलेश शिवतरे, सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, ऋषिकेश कोळपे आदींनी सापळा लावून निवंगुणेला पकडले.