scorecardresearch

Premium

येरवडा मनोरुग्णालयात आणखी एका रुग्णाची आत्महत्या

येरवडा प्रादेशिक मनाेरुग्णालयात एका रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सूरज राजेंद्र कांबळे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या मनोरुग्णाचे नाव आहे.

young trainee doctor Gondia Government Medical College committed suicide
प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता

पुणे : येरवडा प्रादेशिक मनाेरुग्णालयात एका रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सूरज राजेंद्र कांबळे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या मनोरुग्णाचे नाव आहे. कांबळे मानसिक विकाराने ग्रस्त होता. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याला येरवड्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मंगळवारी सूरजने पँट फाडून दोर तयार केला, दोर खिडकीच्या गजाला बांधला. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता.या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासाने पोलिसांना दिली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी येरवडा येथील मनोरुग्णालयात मनोरुग्णांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

medical college
अन्वयार्थ: आरोग्य यंत्रणेचे ‘स्कॅनिंग’ हवे
sasoon hospital
नऊ पोलीस कर्मचारी निलंबित; ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर पसार
Bareilly SDM Viral Video
तक्रार करण्यासाठी कार्यालयात आलेल्या व्यक्तीलाच SDM ने बनवला ‘कोंबडा’, VIDEO समोर येताच संतापले नेटकरी
poor quality development works at visarjan ghat in thane zws
कळवा रुग्णालयातून बाळाचा मृतदेह घेऊन वडिल पसार

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Another patient commits suicide in yerawada psychiatric hospital pune print news rbk 25 ysh

First published on: 20-09-2023 at 19:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×