scorecardresearch

पुणे-सोलापूर रस्त्यावर अमली पदार्थ बाळगणाऱ्या दोघांना पकडले ; २० किलो गांजा जप्त

सापळा लावून दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २० किलो गांजा, दुचाकी, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

man arrest
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : अमली पदार्थ विक्रीस आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोर परिसरात पकडले. त्यांच्याकडून २० किलो गांजा, दुचाकी, मोबाइल संच असा चार लाख तीन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कुमार अनिल नितळे (वय ३०, रा. गायकवाडनगर, लोणी रेल्वे स्थानक परिसर), ऋषीकेश रमेश बेले (वय २४, रा. इंदिरानगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दुचाकीस्वार नितळे आणि साथीदार बेले पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदमवाक वस्ती परिसरात आले होते. त्यांच्याकडे गांजा असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली. सापळा लावून दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २० किलो गांजा, दुचाकी, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, मारुती पारधी, पांडुरंग पवार, राहुल जोशी, योगेश मोहिते आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anti narcotics squad nabbed two drug peddlers at pune solapur road pune print news zws

ताज्या बातम्या