scorecardresearch

Premium

काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी अरविंद शिंदे यांची नियुक्ती

काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी गटनेता अरविंद शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

congress Arvind shinde
संग्रहित छायाचित्र

पुणे : काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी गटनेता अरविंद शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांची प्रभारी शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली असून पक्षाची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर ते शहराध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारतील. आगामी महापालिका निवडणूक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाईल.

काँग्रेसच्या शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरातील ठरावानुसार पाच वर्षांपासून जास्त काळ शहराध्यक्षपदावर कार्यरत असलेले शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे शहराध्यक्षपद रिक्त झाले होते.

Nana-Patole
काँग्रेस पक्षात गटबाजी नाही, तर रविंद्र धंगेकर आजारी असल्याने बैठकीला आले नाही : नाना पटोले
Ramp walk by Varsha Praful Patel
सौ. वर्षा प्रफुल्ल पटेल यांचा रॅम्प वॉक…
ABC chief srinivasan swami
‘एबीसी’च्या अध्यक्षपदी श्रीनिवासन के. स्वामी यांची निवड
Battle of Congress election campaign
कार्यकारिणी बैठकीतून काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी

शहराध्यक्षपदावर नियुक्ती होण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली होती. पक्षाची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सध्या प्रभारी शहराध्यक्ष म्हणून बागवे काम पहातील, अशी शक्यताही पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रदेश काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांच्या नावाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. सध्या ते प्रभारी शहराध्यक्ष असले तरी संघटनात्मक निवडणुकीनंतर ते पूर्णवेळ शहराध्यक्ष होतील, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अरविंद शिंदे हे पक्षाचे अनुभवी नगरसेवक आहेत. स्थायी समितीचे अध्यक्षपद, गटनेता यासह महापालिकेतील विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. काँग्रेसच्या शहराध्यपदासाठी ते आग्रही होते. यापूर्वीही त्यांच्या नावाची चर्चा होती. त्यानुसार त्यांची निवड करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Appointment arvind shinde congress city president organizational party election process ysh

First published on: 07-06-2022 at 20:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×