आमदार लक्ष्मण जगताप, प्रतिभा महिला प्रतिष्ठान तसेच राज्याचा कौशल्य विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सांगवीमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात १ हजार १०० उमेदवारांना नोकरी मिळाली. या उमेदवारांमध्ये ५१ दिव्यांगांचाही समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पुणे : डांबरीकरणाच्या कामामुळे कात्रज घाटात एकेरी वाहतूक

सांगवीतील ‘द न्यू मिलेनिअम’ इंग्लिश शाळेत आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह व अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले. आमदार उमा खापरे, माई ढोरे, हिराबाई घुले, नामदेव ढाके, एकनाथ पवार, सदाशिव खाडे, राजेंद्र राजापुरे व उपायुक्त अनुपमा पवार, सहाय्यक आयुक्त सागर मोहिते आदी उपस्थित होते.

हेही वाचा- आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून न्यायालयात आव्हान

या मेळाव्यासाठी सुमारे ६ हजार जणांनी नोंदणी केली होती. ५१ नामांकित कंपन्या व उद्योजकांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक कंपनीच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांनी थेट मुलाखती घेऊन कागदपत्रे तपासून पात्रतेनुसार उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली. यामध्ये ११०० पेक्षा जास्त जणांना नियुक्ती मिळाली आहे. दिव्यांगांनाही रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी रोजगार मेळाव्यात विशेष कक्ष उभारण्यात आला होता. ८४ दिव्यांगांनी नोंदणी केली होती. त्यातील ५१ दिव्यांगांना नोकरी मिळाली. भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appointment letters for one thousand one hundred people in employment fair in sangvi pune print news dpj
First published on: 05-12-2022 at 18:39 IST