पुणे : राज्य शासनाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (एमपीएससी) सदस्यांच्या रिक्त जागांवर डॉ. सतीश देशपांडे, डॉ. अभय वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र एक जागा रिक्तच ठेवण्यात आली आहे.एमपीएससीमध्ये अध्यक्ष आणि पाच सदस्य अशी सहा सदस्यांची समिती असते. मात्र गेल्या काही वर्षांत राज्य शासनाकडून सदस्यांची नियुक्तीच करण्यात येत नसल्याने सातत्याने सदस्यांच्या जागा रिक्त राहत होत्या. नियुक्तीपूर्वी तीन जागा रिक्त झाल्या होत्या. सदस्यांच्या जागा रिक्त असल्याचा परिणाम एमपीएससीच्या पदभरती प्रक्रियेतील मुलाखती आणि अन्य निर्णय प्रक्रियेवरही होत होता. त्यामुळे सदस्यांच्या सर्व जागांवर सदस्य नियुक्त करण्याची मागणी स्पर्धा परीक्षार्थी संघटनांकडून सातत्याने करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर एमपीएससीतील तीन रिक्त जागांपैकी दोन जागांवर डॉ. सतीश देशपांडे आणि डॉ. अभय वाघ यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे आतापर्यंत रखडलेल्या मुलाखती आता वेगाने पूर्ण होऊ शकतील. त्यामुळे एकूण कामकाजही गतिमान होण्यास मदत होणार आहे. मात्र एक जागा अजूनही रिक्त ठेवण्यात आली आहे.

ज्या घटनात्मक संस्थेकडून शासनासाठीचीच पदभरती केली जाते, त्या संस्थेतील सदस्यांच्या जागा रिक्त ठेवल्या जातात. शासनाकडून जागा जाणीवपूर्वक रिक्त ठेवल्या जाणे ही गंभीर बाब आहे. केरळ लोकसेवा आयोगात एकवीस सदस्य असतात आणि त्या सर्व जागा नियमितपणे भरल्या जातात. राज्य लोकसेवा आयोगात सहाच सदस्य असूनही जागा रिक्त ठेवल्या जातात. आता शासनाने तातडीने रिक्त जागेवर सदस्य नियुक्ती करावी. – महेश बडे, एमपीएससी स्टुडंट्स राइट

BJP star campaigners drops eknath shinde ajit pawar
भाजपाने स्टार प्रचारकांच्या यादीतून एकनाथ शिंदे, अजित पवार यांना वगळले; कारण काय?
pm Narendra Modi Kanhan
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा : नागरिकांना शर्ट, टोपी, सॉक्स काढायला लावले… काय आहे कारण ?
Sharad Pawar Wardha
रथातच बसणार… शरद पवारांचा हट्ट अन् नेत्यांची उडाली तारांबळ
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती का महत्त्वाची?