scorecardresearch

Premium

पिंपरी महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी उल्हास जगताप यांची नियुक्ती

महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी रिक्त असलेल्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदी नगरसचिव उल्हास जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Ulhas Jagtap
महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे १९ फेब्रुवारी २०२१ पासून अतिरिक्त आयुक्तपदाचा प्रभारी पदभार आहे.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: महापालिकेतील स्थानिक अधिकाऱ्यांसाठी रिक्त असलेल्या तिसऱ्या अतिरिक्त आयुक्तपदी नगरसचिव उल्हास जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी प्रसृत केले आहे.

pradeep jambhale patil, additional commissioner, pimpri chinchwad municipal corporation, pradeep jambhale reappointed as additional commissioner
पिंपरी महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी प्रदीप जांभळे यांची पुन्हा नियुक्ती
navi mumbai police, police department, cleanliness drive, pm narendra modi, police department participated in cleanliness drive
नवी मुंबई : स्वच्छता मोहिमेत पोलीस विभागाने नोंदवला उत्स्फूर्त सहभाग
OBC agitator ravindra Tonge
ओबीसी आंदोलनकर्ते टोंगे यांची प्रकृती चिंताजनक, तातडीने रुग्णालयात हलविले
women commission order vishaka committee meeting
नागपूर: विशाखा समिती निष्क्रिय; महिला आयोगाकडून एस.टी.च्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी

नवीन आकृतीबंधानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरचे आणि महापालिका अधिका-यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदांची विभागणी करण्यात आली. राज्य सेवेतील प्रदीप जांभळे आणि विजय खोराटे हे दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तीवरील आहेत. महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे १९ फेब्रुवारी २०२१ पासून अतिरिक्त आयुक्तपदाचा प्रभारी पदभार आहे.

आणखी वाचा-चांदणी चौकाबाबत आणखी एक मोठा निर्णय; रस्ता ओलांडण्यासाठी उभारणार पादचारी पूल

आयुक्त शेखर सिंह यांनी २ मे २०२३ रोजीचा प्रस्ताव आणि शासनाने अतिरिक्त आयुक्त पदावर निवडीने नियुक्तीसाठी स्थापन केलेल्या शासन स्तरावरील समितीची शिफारस विचारत घेवून नगरसचिव उल्हास जगताप यांची अतिरिक्त आयुक्तपदी निवडीने पदस्थापना करण्यास शासनाने मान्यता दिली. महापालिका आस्थापनेवरील पात्र एकमेव अधिकारी असल्याने त्यांची अतिरिक्त आयुक्त पदावर निवडीने नियुक्ती केली.

दरम्यान, जगताप यांना अतिरिक्त आयुक्त म्हणून दहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. नगरसचिव पदाची जबाबादारीही त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Appointment of ulhas jagtap as additional commissioner of pimpri municipal corporation pune print news ggy 03 mrj

First published on: 22-09-2023 at 14:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×