शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) तंत्रज्ञान विद्यापीठासाठी विविध पदांची निर्मिती करण्यास उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मान्यता देण्यात आली. या पदांचे वेतन आणि भत्त्यांचा खर्च विद्यापीठ निधीतून भागवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. सीओईपीला अलीकडेच महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ अधिनियम २०२२ द्वारे विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. अधिसूचनेद्वारे हा अधिनियम अमलात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठासाठी आवश्यक असलेली घटनात्मक आणि प्रशासकीय पदांची निर्मिती करणे प्रस्तावित होते. त्यानुसार कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक, ज्ञान संसाधन केंद्र संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळ संचालक, विद्यार्थी विकास मंडळ संचालक, वित्त व लेखा अधिकारी, प्रशालांचे अधिष्ठाते आदी पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: पुणेकरांचे १४२ कोटी ‘खड्ड्यांत’; रस्ते दुरुस्तीसाठी पूर्वगणन समितीची मान्यता

संबंधित पदांचे वेतन आणि भत्त्यांचा खर्च विद्यापीठ निधीतून भागवण्यात यावा. पदभरतीची कार्यवाही करताना विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने निश्चित केलेली, राज्य शासनाने स्वीकृत केलेली शैक्षणिक पात्रता, अनुभव, प्रचलित आरक्षणाचे धोरण आदी बाबी विचारात घेऊन निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर भरतीची कार्यवाही करावी असेही स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा: आळंदीत वैष्णवांचा मेळा; ज्ञानेश्वर माऊलींचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा संपन्न

स्वायत्त महाविद्यायाचे आता विद्यापीठात रूपांतर झाल्यामुळे काही महत्त्वपूर्ण बदल करावे लागणार आहेत. शासनाने पदांच्या निर्मितीसाठी मान्यता दिल्याने आता डिसेंबरमध्ये पदांच्या भरतीची कार्यवाही सुरू करण्यात येईल. – डॉ. मुकुल सुतावणे, कुलगुरू, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Approval of creation of posts for coep university of technology pune print news tmb 01
First published on: 22-11-2022 at 12:54 IST