पुणेकरांचे १०० कोटी खड्ड्यात! ; महापालिका आयुक्तांकडून रस्ते दुरुस्ती, डांबरीकरणासाठी खर्चाला मंजुरी | Approval of expenses for road repair asphalting by pune Municipal Commissioner pune print news amy 95 | Loksatta

पुणेकरांचे १०० कोटी खड्ड्यात! ; महापालिका आयुक्तांकडून रस्ते दुरुस्ती, डांबरीकरणासाठी खर्चाला मंजुरी

पावसाळापूर्व रस्ते दुरुस्ती आणि पावसाळ्यात पडलेले खड्डे दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने आत्तापर्यंत तब्बल वीस कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

पुणेकरांचे १०० कोटी खड्ड्यात! ; महापालिका आयुक्तांकडून रस्ते दुरुस्ती, डांबरीकरणासाठी खर्चाला मंजुरी
पुणे महानगर पालिका (संग्रहीत छायाचित्र)

पावसाळ्यात रस्ते सुस्थितीत असल्याचा आणि पावसामुळे पडलेले सर्व खड्डे तत्परतेने बुजविल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी शंभर कोटींच्या खर्चाचे नियोजन केले आहे. पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने दुरवस्था झालेल्या रस्त्यांबरोबरच सुस्थितीतील रस्त्यांचीही दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी शंभर कोटींच्या खर्चाला आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी मान्यता दिली आहे. रस्ते दुरुस्तीसाठी त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीला शंभर कोटींचा खड्डा पडणार असून रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली शंभर कोटींची केवळ उधळपट्टीच ठरणार आहे.

हेही वाचा >>> समाजमाध्यमावरील ओळख महागात ,उच्चशिक्षित महिलेची तीन लाखांची फसवणूक

पावसाळापूर्व रस्ते दुरुस्ती आणि पावसाळ्यात पडलेले खड्डे दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने आत्तापर्यंत तब्बल वीस कोटी रुपयांचा खर्च केला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही पावसाने रस्त्यांची चाळण झाल्याने हा खर्च पाण्यात गेल्याने उधळपट्टीच ठरला आहे. दरम्यान, रस्त्यांची चाळण झाल्याने रस्ते दुरुस्तीसाठी पुन्हा नव्याने शंभर कोटींचा खर्च महापािलका करणार आहे.पावसाळ्यात शहर आणि उपनगरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असल्याचे चित्र पुढे आले. वर्षभर सतत सुरू असलेल्या रस्ते खोदाईमुळे रस्त्यावर खड्डे पडल्याची वस्तुस्थिती पुढे आली होती. समान पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण आणि पथ विभागाने एकाच कामांसाठी वारंवार केलेली खोदाई रस्त्यांची चाळण होण्यास कारणीभूत ठरले होते. पावसाळा सुरू झाल्यानंतरही रस्ते खोदाईची कामे शहर आणि उपनगरात कायम राहिली होती. पावसाळापूर्व कामाअंतर्गत रस्ते पूर्ववत करण्यासाठी आणि पावसाने रस्त्यांची दुरवस्था झाल्यानंतर ते नीट करण्यासाठी महापालिकेने जवळपास वीस कोटींचा खर्च केला आहे. मात्र त्यानंतरही शंभर कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. येत्या काही दिवसांत ही कामे सुरू होणार आहेत.

हेही वाचा >>> पुणेकरांचे १०० कोटी खड्ड्यात! ; महापालिका आयुक्तांकडून रस्ते दुरुस्ती, डांबरीकरणासाठी खर्चाला मंजुरी

पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्याची प्रक्रिया पथ विभागाकडून हाती घेण्यात आली. मात्र ही कामे तकलादू स्वरूपाची झाली. अशास्त्रीय पद्धतीने करण्यात आलेले डांबरीकरण, खडीकरण पावसात वाहून गेले. महापालिकेच्या कामाची पोलखोल झाल्यानंतरही महापालिका प्रशानसाकडून रस्ते सुस्थितीत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता शंभर कोटींच्या खर्चाचे नियोजन करण्यात आल्याने रस्ते खराब झाल्याची कबुलीच प्रशासनाकडून देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुशोभीकरणासाठीही पंधरा कोटींची उधळपट्टी
शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी १५ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. शहराचे प्रवेशद्वार असलेले १२ रस्ते अतिमहत्त्वाचे म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. दुभाजक दुरुस्ती, पेंटींंग थर्मोप्लास्टिक पेंट, साइन बोर्ड, कब्र स्टोन, पेडस्ट्रीयन क्रॉसिंग अशी कामे सुशोभीकरणाअंतर्गत करण्यात येणार आहेत. या बारा रस्त्यांपैकी नेहरू रस्ता, खंडुजीबाबा चौक ते पौड फाटा, खडीमशीन चौक ते येवलेवाडी, शंकरशेठ रस्ता, नगर रस्ता, स्वारगेट ते कात्रज-सातारा रस्ता, बिबवेवाडी मुख्य रस्ता, बावधन मुख्य रस्ता या रस्त्यांच्या कामांसाठी प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
समाजमाध्यमावरील ओळख महागात ,उच्चशिक्षित महिलेची तीन लाखांची फसवणूक

संबंधित बातम्या

Exclusive Video : गोष्ट पुण्याची भाग- ५८ : हजारो वर्षांपूर्वी भारतात आलेल्या बेनेइस्राइल समाजाचे प्रार्थनालय
Video : गोष्ट पुण्याची – सदाशिव पेठेतल्या ‘उपाशी विठोबा’च्या नावामागची रंजक कहाणी!
प्रवीण दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात रुपाली चाकणकर आक्रमक; सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
अग्निपथ’साठी बनावट रहिवासी प्रमाणपत्र देणारे दोघे अटकेत
पुणे : मुख्यमंत्र्यांच्या नातवावरील टीकेचे पुण्यातही पडसाद ; ‘एक दुखावलेला दीड वर्षाच्या मुलाचा बाप’ पत्राचे पुण्यात फलक

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“चित्रपटाचा सेट किंवा…” कंगनाबरोबरच्या भेटीनंतर अनुपम खेर यांची पोस्ट चर्चेत
आमिर खानने केलेलं ‘या’ मुकपटात काम; नीना गुप्ता होत्या प्रेयसीच्या भूमिकेत तर आलोक नाथ यांनी साकारला खलनायक
हातामागावरील साडीपेक्षाही पाठकबाईंची ओढणी ठरली लक्षवेधी, लिहिला आहे खास संदेश
युरिक ॲसिड वाढल्याने किडनी फेल होऊ शकते, ‘हे’ पदार्थ खाणे आजपासूनच सोडा
Video: अक्षया-हार्दिकच्या लग्नानंतर ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणादा-पाठकबाईंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल