scorecardresearch

आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता

राज्यातील करोनामुक्त असलेल्या भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांना ठराव करण्याचे निर्देश

पुणे : राज्यातील करोनामुक्त असलेल्या भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव करून शाळा सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले असून, वर्ग सुरू करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी नवे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू करावे लागले. गेल्या काही दिवसांत करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय आणि मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध के ल्या आहेत.  राज्यातील करोनासंबंधित आकडेवारी आणि तज्ज्ञांच्या मतानुसार १० वर्षांखालील मुलांना करोना संसर्ग होण्याची शक्यता सर्वात कमी आहे, तसेच १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना सध्या संसर्गाची शक्यता कमी आहे. शाळा बंद असल्याने घरी बसलेल्या मुलांवर शारीरिक, मानसिक दुष्पपरिणाम होत आहे, शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे करोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव करून पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करावेत. ग्रामपंचायतींनी पालकांशी चर्चा करून ठराव करावा. एखाद्या शाळेत विलगीकरण केंद्र असल्यास ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावे, विलगीकरण केंद्र दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करणे शक्य नसल्यास शाळा अन्य ठिकाणी भरवावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

मार्गदर्शक सूचना

– विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी शाळेत येताना, शाळेत असेपर्यंत मुखपट्टीचा वापर बंधनकारक

– शाळेतील, वर्गातील साहित्य, सुविधांचे सातत्याने निर्जंतुकीकरण

– एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फू ट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी

– विद्यार्थ्यांना अदलाबदलीने शाळेत बोलवावे, ठरावीक विषयांना प्राधान्य

– जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये वर्ग

– करोनासंबंधित लक्षणे आढळल्यास घरी पाठवणे, करोना चाचणी करणे आवश्यक

– शिक्षकांची निवास व्यवस्था त्याच गावात करावी किं वा शिक्षकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू नये

– शाळेत स्वच्छता, निर्जंतुकीकरणाच्या सुविधा आवश्यक

– शिक्षक, शिक्षके तर कर्मचाऱ्यांची प्रतिजन, आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

– वर्गाचे आयोजन शक्यतो खुल्या परिसरात

– शक्यतो पालकांनी स्वत:च्या वाहनाने विद्यार्थ्यांला शाळेत सोडावे

– वाहनचालक, वाहक यांनी स्वत: आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अंतर पालनाची दक्षता

– विद्यार्थ्यांची गर्दी होऊ शकणारे परिपाठ, स्नेहसंमेलन, क्रीडा आदी कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध

– कु टुंबातील सदस्याला करोनासदृश लक्षणे असल्यास पालकांनी विद्यार्थ्यांला शाळेत पाठवू नये

शासनाच्याच निर्णयात विरोधाभास

शासनाच्या परिपत्रकात १० वर्षांखालील मुलांना संसर्ग होण्याची शक्यता सर्वात कमी आहे, असे तज्ज्ञांचे मत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात पूर्व प्राथमिक-प्राथमिकचे वर्ग सुरू करण्याबाबत काहीच निर्णय घेतला नसल्याने शासनाच्या निर्णयातील विरोधाभास दिसून येत आहे.

उपस्थिती बंधनकारक नाही

विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून, पालकांच्या संमतीवर ती अवलंबून आहे. पूर्ण उपस्थितीची पारितोषिके  बंद करावी, असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Approval to start classes from 8th to 12th pune ssh

ताज्या बातम्या