पुणे :  महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पोलिसांच्या पंचाने बचाव पक्षाच्या वकिलांनी घेतलेल्या उलटतपासणीत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे जबाब दिला नसल्याचे विशेष न्यायालयात सांगितले.  

बचाव पक्षाचे वकील अॅड.  प्रकाश सार्लंशगीकर, अॅ्ड. वीरेंद्र इचलकरंजीकर, अॅड. सुवर्णा आव्हाड वस्त यांनी पंच श्याम मारणे यांची  उलटतपासणी घेतली. सीबीआयने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात  मारणे यांचा जबाब नोंदविल्याची कागदपत्रे आहेत. डॉ. दाभोलकर यांची हत्या २० ऑगस्ट २०१३ रोजी शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर करण्यात आली. 

stamp on Pratibha Dhanorkar name
चंद्रपूर : मतदान केंद्रावर प्रतिभा धानोरकरांच्या नावावर Cancelled चा शिक्का, काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ; नेमकं प्रकरण काय?
Sameer Wankhede, Narcotics case,
अमली पदार्थ प्रकरण : समीर वानखेडेविरोधातील प्राथमिक चौकशीचे पुरावे सादर करा, उच्च न्यायालयाचे एनसीबीला आदेश
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज

पंच म्हणून २० ऑगस्ट रोजी पंचनाम्यावर सही केल्याचे मारणे यांनी सरतपासणीत सांगितले.  मारणे यांची बचाव पक्षाच्या वकिलांनी उलटतपासणी घेतली तेव्हा सीबीआयला पंच म्हणून कोणताही जबाब दिला नसल्याचे त्यांनी  सांगितले. मी पोलिसांच्या शांतता समितीचा सदस्य असून पोलीस मित्र म्हणून काम करत असल्याचे मारणे यांनी उलटतपसाणीत सांगितले.