scorecardresearch

धूळवडीच्या दिवशी मांसाहार करण्यासाठी फुकटात कोंबड्या मागून विक्रेत्यास मारहाण करणाऱ्यास अटक

पुण्यातील मावळ परिसरात ही घटना घडली आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

धूळवडीच्या दिवशी मांसाहार करण्यासाठी एका कोंबडी विक्रेत्यास फुकटात कोंबडी मागून, त्याला लोखंडी रॉडने माराहण करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. पुण्यातील मावळ परिसरात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी वैभव सावंत यांनी तळेगाव पोलिसात तक्रार दिली असून, नवनाथ कदम याला तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव सावंत यांचा कोंबड्या विकण्याचा व्यवसाय करतात. काल धुलीवंदन असल्याने ते पहाटेच विविध गावात जाऊन ते चिकन दुकानदारांना कोंबड्या विकत होते. दरम्यान, ते तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवलाख उंबरे येथे चिकन दुकानदाराला कोंबड्या विकण्यास गेले, तेव्हा आरोपी नवनाथ कदम याने मला खायला फुकट कोंबड्या दे असे म्हणून त्यांच्याशी वाद घातला. तक्रारदार वैभव यांनी कोंबड्या देण्यास नकार दिल्यावर आरोपीने त्यांना लोखंडी रॉडने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी फुकटात कोंबड्या मागणाऱ्या नवनाथ ला बेड्या ठोकल्या आहेत. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Arrested for beating up a vendor for free chickens for eating meat msr 87 kjp

ताज्या बातम्या