पुणे : पुणे शहर, जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲड. केतन काेठावळे विजयी झाले. ॲड. कोठावळे यांना दोन हजार ७२८ मते मिळाली. बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲड. राहुल दिंडोकर आणि ॲड. केतन कोठावळे उमेदवार होते. ॲड. कोठावळे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड. दिंडोकर यांना पराभूत केले.

उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड. विश्वजीत पाटील यांना तीन हजार १० आणि ॲड. जयश्री चौधरी-बिडकर यांना दोन हजार २३४ मते मिळाली. सचिवपदासाठी ॲड. राहुल कदम दोन हजार ७१९ मते तसेच ॲड. गंधर्व कवडे यांना दोन हजार ४९१ मते मिळाली. खजिनदारपदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड. समीर बेलदरे यांनी दोन हजार ७९१ मते मिळवून विजय मिळवला. लेखापरीक्षक म्हणून ॲड. अजय देवकर यांची यापूर्वी बिनविरोध निवड करण्यात आली.

Thane Lok Sabha, OBC Bahujan Party candidate,
ठाणे लोकसभेच्या रिंगणात ओबीसी बहुजन पार्टीचा उमदेवार
nashik, Congress, Shirish Kotwal as Nashik District President, Nashik District congress President, Displeasure of local bearers, Shobha Bachhav Nomination in Dhule, dhule lok sabha seat,
काँग्रेस नाशिक प्रभारी जिल्हाध्यक्षपदी शिरीष कोतवाल
VAishali Darekar on shrikant shinde
श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर; ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर म्हणाल्या, “एकवेळ चौक कमी पडतील…”
bharti kamdi marathi news, bharti kamdi palghar latest news in marathi
जिल्हा परिषद अध्यक्ष भूषविलेल्या भारती कामडी यांच्यापुढे आता लोकसभेचे आव्हान

हेही वाचा >>> ७५ टक्के अतिरिक्त कामगार डोईजड; पगारावर उत्पन्नापेक्षा खर्च जास्त

कार्यकारिणी सदस्यपदी ॲड. अमोल वडगणे, ॲड. प्रमोद नढे, ॲड. मयुरी कासट, ॲड. संजय खैरे, ॲड. रेश्मा चौधरी, ॲड. श्रद्धा जगताप, ॲड. राहुल प्रभुणे, ॲड. ऋषिकेश कोळपकर, ॲड. चंद्रसेन कुमकर, ॲड. सचिन माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ॲड. अमित गिरमे यांनी प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. ॲड. दिलीप जगताप, ॲड. माधवी पोतदार, ॲड. शरद कुलकर्णी, ॲड. कांताराम नप्ते, ॲड. सिद्धेश्वर चौधरी यांनी उपनिवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.