‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा’ या अभंगाचे सूर कानात साठवून आषाढी एकादशीनिमित्त भाविकांनी प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी मंदिरात दर्शनासाठी मंगळवारी गर्दी केली. शहरातील विविध विठ्ठल मंदिरांमध्ये नागरिकांनी भाविकतेने दर्शन घेत विठुरायाला तुळशीहार अर्पण केला. रांगोळीच्या पायघडय़ा, फुलांचा गालिचा, आकर्षक विद्युत रोषणाईबरोबरच केळीचे खुंट लावून मंदिरांची सजावट करण्यात आली होती.

ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही, असे भाविक विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिराचे दर्शन घेतात. गणेश गोसावी यांच्या हस्ते पहाटे दोन वाजता विठ्ठल-रखुमाईची महापूजा झाली. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. आषाढीनिमित्त दिवसभरात दोन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. सतीश धोंडिबा मिसाळ प्रतिष्ठानतर्फे भाविकांना खिचडीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. भविकांना वाहने लावण्यासाठी स्वतंत्र वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. एकादशीनिमित्त विठ्ठलवाडी परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Mukh Darshan Arranged for Devotees on Gudhi Padwa at Pandharpur Temple due to Conservation Work
मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा दिवशी विठ्ठलाचे मुख दर्शन दिवसभर : औसेकर महाराज

विविध स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छता मोहीम राबवून भाविकांना आरोग्य सेवा दिल्या, अशी माहिती विठ्ठलवाडी देवस्थान समितीचे विश्वस्त तुषार गोसावी यांनी दिली. शहर आणि उपनगरांमधील विठ्ठल मंदिर परिसर पहाटे पाचपासून विठ्ठलभक्तांनी गजबजलेला होता. मोती चौकातील पासोडय़ा विठोबा मंदिर, नवी पेठ विठ्ठल मंदिर, सदाशिव पेठेतील उपाशी विठोबा मंदिर, नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिर, भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर, टिळक चौकातील लकडीपूल विठ्ठल मंदिर, लिंबराज महाराज चौकातील झांजले विठ्ठल मंदिर, शनिवारवाडय़ाजवळील प्रेमळ विठ्ठल मंदिर अशा विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. या मंदिरामध्ये भजन आणि कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम झाले.

आकुर्डी, खराळवाडीत दर्शनासाठी गर्दी

आषाढी एकादशीनिमित्त खराळवाडी तसेच आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये मंगळवारी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध सामाजिक संस्थांनी भाविकांसाठी उपवासाच्या पदार्थाचे वाटपही केले. आकुर्डी तसेच खराळवाडी येथील मंदिरात पहाटे दोन वाजता विठ्ठल-रखुमाईची महापूजा करण्यात आली. टाळगाव चिखलीमध्येही मंदिरात सोमवार सायंकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. काकड आरतीपासून विठ्ठलनामाचा जप मंदिरात सुरू होता. भजन, कीर्तन आणि भारुडांचा कार्यक्रम सादर झाले. आकुर्डी येथे विठ्ठल दर्शनासाठी होणारी गर्दी ध्यानात घेऊन लहान मुलांची खेळणी तसेच अन्य साहित्य विक्रीच्या थाटल्या गेलेल्या दुकानांमुळे या परिसराला जत्रेचे रूप आले होते. खराळवाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये पिंपरी परिसरातील भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.