scorecardresearch

Chinchwad Bypoll Election Result 2023 : भाऊ, माई आमदार झाल्या! पिंपळे गुरव परिसरात लागले फ्लेक्स

Pune Bypoll Election Result 2023 : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. निकालापूर्वीच पिंपळे गुरव परिसरात अश्विनी जगतापांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावले आहे

Kasba Chinchwad Pot Nivadnuk Nikal 2023
कसबा चिंचवड पोटनिवडणूक निकाल २०२३

Kasba Chinchwad Vote Counting Updates : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप या आघाडीवर असून त्यांचे आमदार असा उल्लेख असलेले फलक त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपळे गुरव परिसरात लागले आहेत. काल देखील पिंपरी- चिंचवड शहरात विविध ठिकाणी फलक लागले होते. परंतु, आज मतमोजणी असून भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप या आठ हजारांच्या आघाडीवर आहेत. अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी विजयाचा ठाम विश्वास लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना व्यक्त केला होता.

हेही वाचा- Kasba Bypoll Election Result 2023: “लोकांनी पैसे घेतले पण मत ह्रदयातल्या धंगेकरांना दिलं”, रवींद्र धंगेकरांचं मोठं विधान; गैरव्यवहाराच्या चर्चांना उधाण!

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे नाना काटे यांच्यात लढत होणार असल्याचे अगोदरपासून बोललं जात होत. भाजपा आणि राष्ट्रवादीचे नेते याठिकाणी ठिय्या मांडून होते. सभा, रॅली, कोपरा सभा घेऊन आपापल्या पद्धतीने मतदारांची माने वळवण्याचा प्रयत्न अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यासह अश्विनी लक्ष्मण जगताप आणि नाना काटे यांनी केला होता. परंतु, आज मतमोजणी होत असून अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या दिशेने मतदारांनी कौल दिल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळेच जगतापांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळे गुरावच्या कार्यालयाच्या परिसरात अश्विनी लक्ष्मण जगताप यांना आमदार पदाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- Chinchwad Bypoll Election Result 2023: बिनविरोध निवडणुकीबाबत अश्विनी जगताप यांची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या, “विरोधकांनी फॉर्म…”!

दुसरीकडे अश्विनी लक्ष्मण जगताप यांची विजयी घोडदौड सुरू आहे. अकराव्या फेरीपर्यंत भाजपाच्या अश्विनी लक्ष्मण जगताप या ८ हजार ५६४ मतांनी आघाडीवर होत्या. महाविकास आघाडी चे उमेदवार नाना काटे आणि बंडखोर राहुल कलाटे हे बिछाडीवर आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 11:27 IST
ताज्या बातम्या