राजकारणाची आवड असलेला कार्यकर्ता सुरुवातीच्या काळात कोणतेही पद पदरात पाडण्यासाठी धडपडत असतो. राजकीय महत्त्वाकांक्षा असलेला हा कार्यकर्ता पहिल्यांदा प्रयत्न करतो तो नगरसेवक होण्याचा. एकदा का नगरसेवक पदाची पायरी चढली की त्याची महत्त्वाकांक्षा वाढत जाते. सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक असेल, तर तो महापौरपदाची माळ गळ्यात पडण्याचे स्वप्न उराशी बागळतो. मग त्यांचा गल्लीतील राजकीय प्रवास दिल्लीच्या दिशेने वाटचाल करू लागतो आणि महापौरपदापासून आमदार होऊन विधान भवन आणि खासदार बनून संसद भवनात जाण्याचे स्वप्न त्यांना पडू लागते. मात्र, पुण्यात अगदी बोटावर मोजता येतील एवढ्याच कार्यकर्त्यांनी खरोखरच दिल्लीपर्यंत मजल मारलेली दिसते. आगामी विधानसभा निवडणुकीतही अनेकांना विधान भवनात जाण्याचे वेध लागले आहेत.

राजकारणाच्या कुरुक्षेत्रामध्ये समोर अनेक राजकीय शत्रू असताना त्यांच्याशी लढत, मतदारांशी मैत्री करत आणि नागरिकांशी संपर्क साधत राजकीय हेतू साध्य करण्याची कसरत अगदी नगरसेवकापासून ते खासदारापर्यंत सर्वांनाच करावी लागते. हे सर्व सोपस्कार पार करत आपापल्या मतदारसंघात पाय रोवून उभे राहण्याचे कसब राजकीय महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या प्रत्येकाला अंगीकारावे लागते. तेदेखील हसतमुख चेहऱ्याने. हे सर्व करत एकेक पद मिळवत पुढे जाताना नगरसेवक होऊन महापालिकेच्या सभागृहात जाण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यापैकी मोजके लोक महापालिका निवडणुकांच्या मांडवाखालून जाऊन सभागृहात पोहोचतात आणि त्यानंतर सर्वांनाच शहराचा प्रथम नागरिक म्हणजे महापौर होण्याचे वेध लागतात. महापौरपदाच्या खुर्चीवर बसल्यावर विधानसभा आणि कालांतराने लोकसभेला उभे राहून विधान भवन आणि संसद भवनात जाण्यासाठी धडपड सुरू होते.

Image Of Devendra Fadnavis.
Devendra Fadnavis : राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
L&T, Subramaniam , 90 hours work ,
काम महत्त्वाचेच, पण जगणे अधिक महत्त्वाचे…
Is ESOP or RSU better for employee welfare
कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी ‘ईसॉप’ की ‘आरएसयू’ चांगले?
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय

आणखी वाचा-नवले पूल परिसरात देहविक्रय करणाऱ्या महिलांवर गुन्हा, नागरिकांच्या तक्रारीनंतर कारवाई

कार्यकर्ता ते महापौर आणि महापौर ते आमदार आणि खासदार…असा राजकीय प्रवास यशस्वीपणे पूर्ण केलेले पुण्यातील काही मोजके राजकीय नेते आहेत. त्याचा आढावा घेतल्यास राजकीय प्रवास हा कसा खडतर असतो, ते दिसून येईल.

शहराचा प्रथम नागरिक महापौर हे पद हे शहरासाठी सन्मानाचे असते. पुण्यात महापौर पद यशस्वीपणे साभाळल्यानंतर आमदार म्हणून विधान भवनात आणि खासदार बनून संसदेपर्यंत मजल मारण्याची संधी काही मोजक्याच राजकीय नेत्यांना मिळाली आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पहिले महापौर बाबुराव सणस हे त्या काळातले पुण्यातील बडे प्रस्थ होते. त्यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर प्राबल्य होते. त्यामुळेच त्यांनी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून १९६२ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून ते आमदार झाले. महापौरपदानंतर आमदार झालेली ही पुण्यातली पहिली राजकीय व्यक्ती.

आणखी वाचा-कल्याणीनगर अपघात प्रकरण : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्याविरुद्ध खटला चालविण्यास राज्य शासनाची मंजुरी

माजी महापौर शिवाजीराव ढेरे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून १९७२ मध्ये काँग्रसकडून निवडणूक लढविली आणि ते निवडून आले होते. माजी महापौर वि. भा. पाटील यांचे कार्यक्षेत्र बोपोडी भागात होते. तत्कालीन बोपोडी विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्याने माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी दिली होती. माजी आमदार भाई वैद्या हे पुण्याचे महापौर होते. ते १९७८ मध्ये तत्कालीन भवानी पेठ विधानसभा मतदारसंघातून जनता पक्षाकडून निवडून आले होते. वसंतराव थोरात हे १९९१ मध्ये काँग्रेसकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. याशिवाय चंद्रकांत शिवरकर, चंद्रकांत छाजेड हे अनुक्रमे पुणे कॅन्टोन्मेंट आणि बोपोडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

मुक्ता टिळक या कसब्यातून निवडून आल्या होत्या. शिवाजीराव भोसले आणि दीप्ती चवधरी यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली होती. पुण्याचे महापौरपद भूषविलेले आणि संसदेमध्ये पुण्याचे प्रश्न मांडणाऱ्या खासदारांमध्ये ना. ग. गोरे आणि अॅड. वंदना चव्हाण यांच्यानंतर विद्यामान केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही काही महापौर हे आमदारकीचे स्वप्न बाळगून आहेत. त्यामुळे निकालानंतर या यादीत आणखी कोणाची भर पडणार, हे स्पष्ट होईल.

sujit.tambade@expressindia.com

Story img Loader