पिंपरी : मावळ विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी चुरस होती. वडगाव, तळेगाव दाभाडे, लोणावळा या शहरी भागात सकाळच्या टप्प्यात जास्त मतदान झाले. तर, दुपारनंतर ग्रामीण भागातील केंद्रांवर गर्दी होती.

मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके व अपक्ष बापू भेगडे यांच्यात तुल्यबळ लढत आहे. मावळ मतदारसंघाचा बहुतांश भाग ग्रामीण आहे. बराचसा परिसर डोंगर-दऱ्यांचा दुर्गम आहे. तरीही, शहरातील मतदारांच्या तुलनेत हा मतदार सजग असल्याचे दिसून येत आहे. सायंकाळी पाचपर्यंत मावळमध्ये ६४.४४ टक्के मतदान झाले होते. मतदार सकाळी सातपासून केंद्रावर येत होते. त्यातही तरुणांचा समावेश जास्त होता. मात्र, नऊनंतर केंद्रावर रांगा लागल्या होत्या. उमेदवारांच्या स्थानिक नेत्यांची, कार्यकर्त्यांची मतदारांना केंद्रावर आणण्याची लगबग सुरू होती.

अरविंद केजरीवालांना पराभूत करणारे 'जायंट किलर' पर्वेश वर्मा कोण आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Who is Parvesh Varma : अरविंद केजरीवालांना पराभूत करणारे ‘जायंट किलर’ पर्वेश वर्मा कोण आहेत?
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Northeast Delhi Assembly Election Result
दंगलग्रस्त भागातही भाजपाचा डंका; तीन जागा जिंकून आघाडी, तर ‘आप’ला एकच ठिकाणी यश
Delhi Assembly Election Results 2025 and yamuna
Delhi Election Results 2025: दिल्लीतील सत्तापालटासाठी कारण ठरलेल्या यमुनेचा इतिहास काय सांगतो? सद्यस्थिती काय?
Delhi election results today
दिल्लीत कोणाची सत्ता?
Delhi assembly elections 2025 news in marathi
दिल्ली’साठी आज मतदान; तिरंगी सामन्यात मतटक्क्यावर सत्तेचे गणित
congress government analysis Telangana caste Survey
अन्वयार्थ : जनगणना कधी?
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”

हेही वाचा >>>पिंपरीतील शेवटच्या टप्प्यातील मतदार कोणाला धक्का देणार?

शहरी भागात सकाळी मतदान उत्साहात सुरू झाले. मात्र, दुपारी तीननंतर शुकशुकाट होता. काही मतदान केंद्रांवरील कार्यकर्ते मतदारांपैकी कोणी राहिले आहे का याची चाचपणी करत, मतदारांना शोधून आणून मतदान करायला लावत होते. काही केंद्रांवर मतदारांची नावे यादीमध्ये नसल्याच्या किंवा मतदान केंद्र बदलल्याच्या तक्रारीमुळे मतदारांसह कार्यकर्त्यांची, अधिकाऱ्यांची धावपळ होत होती. तुरळक ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडत होते. पवन मावळ, आंदर मावळमधील ग्रामीण भागातील मतदारांनी मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा लावल्या होत्या. वयोवृद्ध, तसेच दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन येण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था प्रशासनाने केली होती. मावळात नऊ वाजेपर्यंत ६.०७ टक्के मतदान झाले. ११ वाजेपर्यंत १७.९२ टक्के, एक वाजेपर्यंत ३४.१७ मतदानाची नोंद झाली. तीन वाजेपर्यंत ४९.७५ टक्के मतदान झाले. पाच वाजेपर्यंत ६४.४४ टक्के म्हणजेच २,४८,८५८ मतदारांनी मतदान केले. एकूण ७२.१० टक्के मतदान झाले आहे.

Story img Loader