महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा या परीक्षेतील सहायक कक्ष अधिकारी या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. त्यात जळगाव जिल्ह्यातील विशाल चौधरी यांनी राज्यात आणि मागास वर्गवारीतून प्रथम क्रमांक मिळवला. तर सातारा जिल्ह्यातील शीतल फाळके यांनी महिला वर्गवारीतून पहिला क्रमांक पटकावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पिंपरी- चिंचवड की बिहार! अज्ञातांनी तीन ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत हवेत झाडल्या ८ गोळ्या, घटना सीसीटिव्हीत कैद

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. सहायक कक्ष अधिकारी या संवर्गाच्या शंभर पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. अंतिम निकालासह प्रत्येक प्रवर्गातून शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (कटऑफ) प्रसिद्ध करण्यात आले. उमेदवारांनी त्यांच्या अर्ज नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या, आरक्षण-प्रमाणपत्राचे दावे प्राधिकरणाकडून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. उमेदवारांनी दिलेली माहिती खोटी, चुकीची आढळल्यास, अर्जातील दाव्यानुसार प्रमाणपत्राची पूर्तता न केल्यास, अन्य कारणांमुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. समांतर आरक्षण आणि अन्य मुद्द्यांबाबत न्यायालय, न्यायाधिकरणात दाखल विविध न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून निकाल जाहीर करण्यात आल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.

हेही वाचा- पुणे : कला-क्रीडा गुण प्रस्तावासाठी आता ५० रुपये छाननी शुल्क; राज्य मंडळाचा निर्णय; फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून अंमलबजावणी

शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची असल्यास गुणपत्रके ऑनलाइन खात्यात पाठवल्यापासून दहा दिवसांत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याचेही एमपीएससीने नमूद केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assistant cell officer limited divisional examination final result announced pune print news ccp14 dpj
First published on: 06-12-2022 at 20:29 IST