scorecardresearch

Premium

लोणावळा: सहाय्यक पोलिस उपाधीक्षकांचा जुगार अड्ड्यावर थेट छापा; अनेकांचे धाबे दणाणले!

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी वडगाव मावळ येथील जुगार अड्ड्यावर थेट छापा मारून जुगार खेळत असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे.

raids on gambling dens
गणेश उत्सवात सदस्यांनी जुगार खेळू नये असे आवाहन देखील त्यांनी केले.(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोणावळा: लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी वडगाव मावळ येथील जुगार अड्ड्यावर थेट छापा मारून जुगार खेळत असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. वडगाव मावळच्या हद्दीतील आंबेडकरनगर मधील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या शेजारी असलेल्या पत्रा शेडमध्ये हा गोरख धंदा सुरू होता. जुगार सुरू असलेल्या ठिकाणाहून सहा लाख ४१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी थेट कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

आणखी वाचा-‘डाव्या’ विचारसरणीला रोखण्यासाठी सजग राजकीय भूमिका हवी; सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांचे मत

NIMA, nashik industries and manufacturers association, workers without helmet, punishment to factory owners
नाशिक : विनाहेल्मेट कामगारप्रश्नी कंपनी मालकांना दोषी धरणे अयोग्य, निमाचे प्रादेशिक परिवहनला साकडे
journalists invited bjp workers for dinner at the dhaba
पत्रकारांचे भाजप कार्यकर्त्यांना ढाब्यावर जेवणाचं आवतण; बुलढाण्यातील पत्रकारांची ‘आधुनिक गांधीगिरी’
Surat Chennai highway land acquisition Objection of farmers
सूरत-चेन्नई महामार्ग भूसंपादनात चुकीचे मूल्यांकन; शेतकऱ्यांचा आक्षेप
Bareilly SDM Viral Video
तक्रार करण्यासाठी कार्यालयात आलेल्या व्यक्तीलाच SDM ने बनवला ‘कोंबडा’, VIDEO समोर येताच संतापले नेटकरी

लोणावळ्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना माहिती मिळाली की वडगाव मावळ या ठिकाणी काही व्यक्ती जुगार खेळत आहेत. तातडीने त्या ठिकाणी जाऊन पोलीस स्टाफसह सत्यसाई कार्तिक यांनी छापा मारला. आरोपींकडून जुगाराची साधने जप्त केली असून १० मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आरोपींकडून एकूण ६ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. नऊ जणांविरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम सन १८८७ प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गणेश उत्सव येत असून यादरम्यान मंडळाच्या सदस्यांनी जुगार म्हणजेच पत्ते खेळू नयेत असं आवाहन देखील सत्यसाई कार्तिक यांनी केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Assistant deputy superintendent of police direct raids on gambling dens in lonavala kjp 91 mrj

First published on: 18-09-2023 at 09:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×