पिंपरी : पोलिसांच्या मोटारीने (व्हॅन) महिलेसह एका दुचाकीला धडक देऊन गंभीर जखमी केल्याप्रकरणी चालक, सहायक फौजदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीत फौजदाराने मद्यपान केल्याचेही निष्पन्न झाले आहे. मंगळवारी (४ जून ) दुपारी अडीचच्या सुमारास बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पोलीस चौकीसमोर हा प्रकार घडला होता.

नागेश भालेराव असे निलंबित सहायक फौजदाराचे नाव आहे. भालेराव हा हिंजवडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहे. या अपघातात शंकुतला पंडित शेळके (रा. म्हाळुंगे) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडली. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तासाठी जागा दिलेली नसतानाही भालेराव हा बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पोलीस चौकीसमोर गेला. मोटारीत बसला असताना गाडीचे इंजिन सुरू होते. भालेराव याचा पाय वेग वाढवण्याच्या पेडलवर (ॲक्सिलेटर) पडला. त्यामुळे वाहनाने समोरून पायी जाणाऱ्या शकुंतला यांच्यासह उभ्या दुचाकींना धडक दिली. यामध्ये शकुंतला यांना गंभीर दुखापत झाली. तसेच, एका तरुणाच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भालेराव यांनी मद्यसेवन केले असल्याचा संशय आला. त्यामुळे भालेराव यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये घटनेच्या आधी भालेराव यांनी दारूचे सेवन केल्याचे उघड झाले. भालेराव यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

A policeman assaulted a PMP driver along with a carrier Pune
पोलीस कर्मचाऱ्याची मुजोरी; पीएमपी चालकासह वाहकाला मारहाण
Smita Sabharwal
Disability Quota : पूजा खेडकर प्रकरणानंतर महिला अधिकाऱ्यांचा अपंग कोट्यावरच आक्षेप; म्हणाल्या, “अपंग सर्जनवर…”
Pune, stock broker, kidnapping, ransom, Stock Market Losses, one crore rupees, Amravati, police arrest, stock market loss,
शेअर दलालाचे एक कोटींच्या खंडणीसाठी अपहरण, दलालाची अमरावतीतून सुटका; तिघे गजाआड
Anant Radhika Wedding
अंबानींच्या लग्नात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिल्याप्रकरणी अभियंत्याला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
| Case against couple for cheating Mumbai
मुंबई: फसवणूकप्रकरणी दाम्पत्याविरोधात गुन्हा
case has been registered in the death of two children due to suffocation in a motor vehicle
मुंबई : मोटरगाडीमध्ये गुदमरून दोन बालकांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
tinder scam
टिंडरवरून डिनर डेट करणं युवकाला पडलं महाग; जेवणांचं बिल झालं ४४ हजार, नेमका प्रकार काय?
mumbai, Stock Market Investment Scam, Man Arrested in Mumbai for Cheating Woman, scam happend with woman of lakhs, Investment Scam, mumbai news,
समभागांच्या गुंतवणुकीवरील नफ्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक, आरोपीला अटक

हेही वाचा >>>पुण्यात विनानोंदणी ११ वाहने रस्त्यावर अन् ३ अल्पवयीन चालक आढळले! कल्याणीनगर अपघातानंतर आरटीओला जाग

या अपघातप्रकरणी सहायक फौजदार भालेराव यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यामध्ये त्यांनी दारूचे सेवन केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबन करण्यात आले आहे. त्यांची खात्याअंतर्गत चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले.