खगोलशास्त्रविषयक शिबिराचे आयोजन

खोडद येथील ‘जीएमआरटी’ या महाकाय दुर्बिणीसह आयुकाच्या गिरावली येथील दुर्बिणीला भेट देण्याची संधी खगोलशास्त्रविषयक शिबिरातून उपलब्ध होणार आहे.

खोडद येथील ‘जीएमआरटी’ या महाकाय दुर्बिणीसह आयुकाच्या गिरावली येथील दुर्बिणीला भेट देण्याची संधी खगोलशास्त्रविषयक शिबिरातून उपलब्ध होणार आहे. ‘अ‍ॅस्ट्रॉन- एस एच के ट्रस्ट’ या संस्थेतर्फे ‘अ‍ॅस्ट्रोटेन्मेंट’ या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ६ व ७ मे रोजी हे शिबिर होणार असून ते सशुल्क आहे.
संस्थेच्या संस्थापक श्वेता कुलकर्णी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. नक्षत्रांची माहिती घेणे तसेच दुर्बिणीतून गुरू, शनि व मंगळ ग्रह, तारकापुंज व द्वैती तारे यात पाहता येतील. एरिक डेब्लॅकमिअर या अमेरिकन अंतराळवीराशी संवाद साधण्याबरोबरच विपुला अभ्यंकर यांची ‘डे टाइम अ‍ॅस्ट्रोनॉमी’ ही कार्यशाळाही शिबिरात होईल, असे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- ८८०६१०७५१०

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Astronomy camp organized