पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवडच्या पिंपळे गुरव येथे जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वटवृक्षाला चक्क पुरुषाने सात फेरे मारले आहेत. आजचा हा सण महिलांसाठी असल्याचे नेहमीच बोललं जातं. याला छेद देत पुरुषांनी देखील वटवृक्षाला फेरे मारून स्त्री पुरुष समानता असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी हक्क संरक्षण या संस्थेकडून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी पत्नीसोबत पतीने देखील वटवृक्षाला सात फेरे मारले. हे या संस्थेचे दहावा वर्ष आहे.

आणखी वाचा-पुणे : अपघातानंतर वाहतूक पोलिसांना जाग; गंगाधाम रस्त्यावर जड वाहनांना बंदी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At pimpale gurav of pimpri chinchwad men celebrate vatpaurnima for wife kjp 91 mrj