पिंपरी-चिंचवडमध्ये हळहळ व्यक्त करायला लावणाऱ्या दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या कारचा दरवाजा अचानक उघडल्याने, विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीची त्याला धडक बसली व ही दुचाकी रस्त्यावरून धावणाऱ्या ट्रक खाली आली. या दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा या अपघतात घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य एकजण जखमी झाला. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे.

११ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास राम बाळासाहेब बागल (वय- २४) हा आपल्या चुलत भावासह दुचाकीवरून दिघी आळंदी रोडवरून विरुद्ध दिशेने जात होता. तेव्हा, रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कार चालकाने अचानक दरवाजा उघडला आणि दुचाकीची त्याला धडक बसल्याने दुचाकीवरील राम रस्त्यावर पडला, दरम्यान त्याच क्षणी समोर येणाऱ्या ट्रक खाली तो सापडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

3 year old girl fall to death into a pothole on highway near titwala
टिटवाळ्याजवळ महामार्गाच्या खड्ड्यात पडून बालिकेचा मृत्यू
nagpur, wrong landing point, construction, bridge, kasturchand park, confusion in drivers, traffic congestion,
वाहतूक कोंडीमुळे नागपूरकर हैराण! कस्तूरचंद पार्कजवळील पुलाचे लँडिंग चुकले…
shocking video
धक्कादायक! भर रस्त्यात दुचाकीवर भयानक स्टंट करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल, पोलीस म्हणाले..
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका

ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटने प्रकरणी टेम्पो चालक धनराज कैलास पाटील यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.