पुण्यात टॅक्सचा प्रश्न मोठा आहे. मी त्यासंदर्भात आज आयुक्तांची भेट घेतली. पुणेकरांची बाजू आम्ही विधानसभेत मांडणार आहे असं कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. पुण्यात टॅक्स इतका आहे की लोक राहण्यास तयार नाहीत अशी स्थिती आहे. ते सगळं आम्ही आयुक्तांना सांगितलं आहे. सध्या आम्ही विरोधात बसलोय पण लवकरच आम्ही सत्तेत येणारच असंही रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं आहे. पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हेमंत रासने हा मोठा माणूस आहे

हेमंत रासने हा मोठा माणूस आहे. त्यांनी मला जे काही ऐकवलं त्यावर मी काय बोलणार? फक्त त्यांना इतकंच सांगेन माझाही राजकीय कारकीर्द सुमारे ३० वर्षांची आहे. हेमंत रासने यांच्यापेक्षा माझी राजकीय कारकीर्द जास्त आहे असं म्हणत हेमंत रासनेंना रवींद्र धंगेकर यांनी टोला लगावला.

Ashok Chavan, kanhan, Nana Patole,
नाना पटोले हे शरद पवार, उद्धव ठाकरेंसमोर बोलू शकत नाही, अशोक चव्हाण यांची टीका; म्हणाले, “स्वप्नांवर पाणी टाकले…”
sangli Mahavikas Aghadi
मविआची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर होताच कॉंग्रेस संतप्त, बैठकीत पुढील निर्णय – आमदार सावंत
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान
ahmednagar lok sabha
विखे-पाटील यांच्या माफीनाम्यानंतरही भाजपमधील निष्ठावंतांची नाराजी कायम

शरद पवारांनी आशीर्वाद दिला

महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी कसबा निवडणूक जिंकलो आणि त्यानंतर मी शरद पवारांची भेट घेतली. त्यांनी मला आशीर्वाद दिला. त्यांच्या शेजारी उभं राहायला मिळणं हीदेखील माझ्यासारख्या माणसासाठी मोठी गोष्ट असते. असंही रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. शरद पवार जेव्हा एखादा शब्द बोलतात तेव्हा त्याचे अनेक अर्थ निघतात असंही धंगेकर यांनी म्हटलं आहे.

पुण्यात मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आमदारीकीची जागा रिक्त झाली होती. त्या ठिकाणी भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती तर महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. १० हजार ५०० मतांनी रवींद्र धंगेकर विजयी झाले. त्यानंतर रवींद्र धंगेकर हे नाव चांगलंच चर्चेत आहे. पुणेकरांच्या टॅक्सचा प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने धंगेकर हे पुणे महापालिकेत आले होते. त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन या प्रश्नी काही मार्ग काढता येईल का? याची विनंती केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. आम्ही आत्ता विरोधात आहोत पण २०२४ मध्ये सत्तेत येऊ असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.