scorecardresearch

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाचेच अत्याचार

सतत होणारा त्रास आणि लग्न करत नसल्याने या तरुणीने खडक पोलिसांकडे तक्रार दिली

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाचेच अत्याचार
( संग्रहित छायचित्र )

ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याने शहर पोलीस दलातील एका महिला कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छायाचित्रे मित्रांना दाखवून तिची बदनामी केली असून तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संदीप कुंडलिक जाधव (वय २८, रा. पुणे ) या कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

हेही वाचा – पिंपरी : ज्येष्ठ नागरिकाकडे ५० हजारांची लाच मागितली

याबाबत २३ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २०२० ते २०२२ या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पुणे शहर पोलीस दलात पोलीस शिपाई आहेत. तर, संदीप हा पुणे ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई आहे. त्यांची ओळख होती. ओळखीनंतर संदीपने लग्न करण्याचा बहाणा करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे इतर मुलींशी अनैतिक संबंध होते. त्याबाबत विचारणा केल्यानंतर तो तक्रारदार तरुणीला मारहाण करत होता. तिच्याशी विवाह न करता तिची फसवणूक केली. तर वारंवार मारहाणकरून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सतत होणारा त्रास आणि लग्न करत नसल्याने या तरुणीने खडक पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत संदीपला अटक केली. अधिक तपास महिला उपनिरीक्षक पवार या करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या